क:हाड (जि. सातारा) : ‘ऊसदराच्या चळवळीत आयुष्य घालविणारे आज देशात आणि राज्यात सत्तेत सहभागी
झाले आहेत़ त्यामुळे यंदापासून उसाला चांगला दर मिळेल. आम्हीही त्या दराची वाट पाहतोय,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी चळवळीतील नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला़
क:हाड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत
होत़े
पवार म्हणाले, उसाला 27क्क् रुपये दर मिळावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मागणी आहे, तर इतर शेतकरी संघटनांनी 35क्क् रुपयांर्पयत दर मागितले आहेत़ मग 27क्क् रुपयांर्पयत पहिली उचल मिळायला हरकत नाही़,’ अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली़ मराठवाडा, विदर्भामधील दुष्काळी स्थितीबाबत ते म्हणाले, दुष्काळाबाबत राज्य सरकारने अजूनही काही ठोस निर्णय घेतल्याचे दिसत नाही़ केंद्राची मदत हवी असल्यास तसा प्रस्ताव राज्य शासनाने पाठवावा लागतो़ त्यानंतर केंद्रीय कृषी विभागाची समिती तज्ज्ञांमार्फत पाहणी करते. मग मदतीचा निर्णय होतो; पण याबाबत राज्य सरकारने हालचाली केल्याचे ऐकिवात नाही़ पिण्याचे पाणी, पशुधन, बँक कज्रे, वीज बिले सवलती देण्याबाबत लवकर निर्णय होणो अपेक्षित आह़े दुष्काळाची खरी झळ डिसेंबरनंतर जाणवते. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल, असे पवार म्हणाल़े (प्रतिनिधी)
़़़तर सुंठीवाचून खोकला गेला!
‘राज्यात शिवसेना भाजपाबरोबर सत्तेत गेली तर सुंठीवाचून खोकला गेला,’ अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. असे घडल्यास विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केल़े राज्यातील भाजपा सरकारमध्ये शिवसेना सहभागी होणार की नाही हा त्यांचा प्रश्न आह़े भाजपाने कोणाचा पाठिंबा घ्यायचा हे ते ठरवतील़ आम्ही फक्त बाहेरून पाठिंबा दिला आह़े़ शिवसेना जर भाजपाबरोबर गेली, तर विरोधी पक्षनेतेपदावरही आमचा दावा असणार नाही, असे ते म्हणाल़े