शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चंदूच्या वापसीची प्रतीक्षा, चव्हाण परिवाराची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 30, 2016 18:17 IST

सामनेर येथील मूळ रहिवासी असलेला व पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण अद्याप न परतल्याने चव्हाण परिवाराची दिवाळी अंधारात

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 30 - सामनेर येथील मूळ रहिवासी असलेला व पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण अद्याप न परतल्याने चव्हाण परिवाराची दिवाळी अंधारात आहे. चंदू चव्हाणला बेपत्ता होवून जवळपास एक महिना उलटूनही काही ठोस पावले उचलली गेली नाही. त्याला परत आणावे यासाठी चव्हाण परिवाराने संबंधित खात्यातील मंत्री, मनोहर परिकर, सुषमा स्वराज, सुभाष भामरे यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी केवळ आश्वासने दिली. मात्र उपयोग झाला नाही. यामुळे चंदू चव्हाण याचे काका , आत्या व भाऊबंद यांची दिवाळी पूर्णपणे अंधारात आहे. गावात चव्हाण भाऊबंदकीची सुमारे ७० घरे असून सर्वांनीच दिवाळी साजरी न करण्याचे ठरविले आहे. एवढेच नव्हे तर सामनेर गावात दिवाळी सण असल्यासारखे वाटत नाही. ग्रामस्थांची फक्त नावालाच दिवाळी आहे. पाहिजे तसा उत्साह नाही. जोपावेतो आमचा चंदू परत येत नाही तोपावेतो कोणतेही सण साजरे करणार नाही असे त्याचे काका नारायण चव्हाण यांनी सांगितले. ज्या दिवशी चंदू परत येईल तो दिवस आमच्यासाठी दिवाळीचा असेल असेही या परिवाराचे म्हणणे आहे. या घरावर आकाशकंदील तसेच घरात मिष्टान्न नाही. चंदूचे आईवडील लहानपणीच वारल्याने त्याचे बालपण सामनेर येथे आत्या आणि काकांकडे गेले असून सरकारने चंदू चव्हाण याची सुखरुप सुटका करावी अशी अपेक्षा परिवाराने व्यक्त केली आहे.