शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘सेंटर आॅफ एक्सलन्स’ची प्रतीक्षा

By admin | Updated: March 5, 2016 00:48 IST

फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) ला ‘सेंटर आॅफ नॅशनल एक्सलन्स’चा दर्जा देण्याच्या तत्कालीन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला

पुणे : फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) ला ‘सेंटर आॅफ नॅशनल एक्सलन्स’चा दर्जा देण्याच्या तत्कालीन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला, तरी त्याला मुहूर्त लागलेला नाही. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून या संदर्भातील प्रस्ताव मनुष्यबळ विकास खात्याच्या दफ्तरी दाखल झाला असून, प्रक्रियेची गाडी पुढे सरकलेली नाही. चित्रपटक्षेत्राचा भक्कम आधारस्तंभ असलेले ‘एफटीआयआय’ हा दर्जा मिळण्याच्या अजूनही प्रतीक्षेतच आहे.‘एफटीआयआय’सह कोलकात्याच्या सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एसआरएफटीआय) आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) यांना ‘सेंटर आॅफ नॅशनल एक्सलन्स’चा दर्जा देण्याचे आश्वासन माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आले होते. मंत्रालयाने सेंट्रल युनिव्हर्सिटी अ‍ॅक्टप्रमाणे केलेल्या प्रस्तावाची चाचपणी मनुष्यबळ खात्याकडून केली जाईल, असे सांगण्यात आले होते; मात्र ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी गजेंद्र चौहान आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीवरून छेडलेल्या आंदोलनामुळे या घोषणेकडे केंद्र सरकारचे साफ दुर्लक्ष झाले. मनुष्यबळ विकास खात्याकडे पाठविलेला हा प्रस्ताव चर्चेच्या स्वरूपातच आहे.(प्रतिनिधी)> उच्च शिक्षण, संशोधनाची दालने होतील खुलीआजची परिस्थिती अशी आहे की, ‘एफटीआयआय’ ही स्वायत्त संस्था असल्याने डिप्लोमा अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता नाही. त्यामुळे पदव्युत्तर पदवी डिप्लोमा असूनही विद्यार्थ्यांना स्वत:च्या विषयांमध्ये पीएच.डी अथवा संशोधन करता येणे शक्य नाही. या दृष्टीने ‘एफटीआयआय’ला सेंट्रल युनिव्हर्सिटी अ‍ॅक्टनुसार ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’चा दर्जा मिळाल्यास ‘एफटीआयआय’ला शैक्षणिक दर्जा मिळण्याबरोबरच विद्यापीठांच्या सोयीसुविधा प्राप्त होतील आणि विद्यार्थ्यांना देशासह बाहेरही उच्च शिक्षण आणि संशोधनाची दालने खुली होतील. मात्र, ही घोषणा करून आज दोन वर्षे उलटली, तरी त्याचे पुढे काही झालेले नाही. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला ‘एफटीआयआय’ला ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’चा दर्जा देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले होते. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून मनुष्यबळ विकास खात्याकडे गेलेल्या प्रस्तावाचे घोंगडे अद्यापही भिजतच पडले आहे. ‘एफटीआयआय’ला हा दर्जा मिळणार, तरी कधी याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह ‘एफटीआयआय’चेप्रशासन करीत आहे.एफटीआयआयला ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’चा दर्जा देण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मंत्रालयाकडून मनुष्यबळ विकास खात्याकडे प्रस्ताव गेलेला आहे; मात्र ही प्रक्रिया कशामुळे थांबली आहे, हेच कळत नाही. संसदेमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतरच हा दर्जा मिळू शकणार आहे. - उत्तमराव बोडके, कुलसचिव, एफटीआयआय