शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक अहवालाच्या मंजुरीची प्रतीक्षा

By admin | Updated: September 19, 2016 05:35 IST

मध्य रेल्वेवरील सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरिडोर आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते विरार हे दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होतील

मुंबई : लोकल प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मध्य रेल्वेवरील सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरिडोर आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते विरार हे दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होतील. मात्र तत्पूर्वी या प्रकल्पांचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाकडे जुलै महिन्यात सादर केल्यानंतर त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा एमआरव्हीसीला (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आहे.रखडलेला चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड आणि सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरिडोर प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात नुकतीच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती. या बैठकीत पश्चिम रेल्वेवरील एलिव्हेटेड प्रकल्प वांद्रे ते विरार आणि त्यानंतर वांद्रे ते चर्चगेट प्रकल्प असा दोन टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर सीएसटी ते पनवेल रेल्वे आणि रोड असा मल्टिमॉडल एलिव्हेटेड कॉरिडोरही बांधण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर हे दोन्ही प्रकल्प एमआरव्हीसीकडून मार्गी लावण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्प एमआरव्हीसीच्या अखत्यारीत येत असल्याने, त्यांनी या प्रकल्पांचे सुधारित प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्पांचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे जुलै महिन्यात पाठविला. यासंदर्भात एमआरव्हीसीचे प्रवक्ता प्रभात रंजन यांनी सांगितले की, एलिव्हेटेड व फास्ट कॉरिडोर प्रकल्पाच्या प्राथमिक अहवालाबाबत रेल्वे बोर्डाकडून मंजुरीविषयी काही माहिती देण्यात आलेली नाही. त्याचीच प्रतीक्षा असून, प्रकल्पातील बदल त्यांच्याकडून सुचविण्यात येतील. बदल नसल्यास तोच अंतिम अहवाल असेल, असे ते म्हणाले.