शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘बार्टी’च्या समतादूतांना नियुक्तीपत्राची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 04:38 IST

राज्यातील गावागावांत फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार प्रचारण्यासाठी काम करणाऱ्या समतादूतांना चार महिन्यांपासून नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत.

प्रफुल्ल बाणगावकर,कारंजा लाड (जि. वाशिम)- परिवर्तनाची दिंडी खांद्यांवर घेऊन राज्यातील गावागावांत फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार प्रचारण्यासाठी काम करणाऱ्या समतादूतांना चार महिन्यांपासून नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात साजरी होत आहे. या समतादूतांना ११ महिन्यांचा करार संपल्यानंतर नव्याने नियुक्तीपत्र देणे आवश्यक असते.‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘बार्टी’च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समतादूत प्रकल्प राबविण्यात येत आहे. जातीविरहित समता प्रस्थापित करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समतादूत नेमण्यात आले. त्यांचे रितसर प्रशिक्षणही नाशिक येथे झाले. त्यानंतर समतादूतांना २७ जुलै २०१५ ला रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. या समतादूतांनी महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समताविषयक विचार, शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा व गाव बैठकीच्या माध्यमातून मांडले. तसेच त्यांच्याकडून अंधश्रद्धा निर्मूलन, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट याबाबतही जनजागृती करण्यात आली. मात्र २७ जून २०१६ ला समतादूतांचा ११ महिन्यांचा करार संपला. त्यानंतर बार्टीने आढावा घेतला; परंतु अद्याप समतादूतांना नियुक्तीचे आदेश दिले नाहीत.>करार संपलेल्या पूर्वीच्याच समतादूतांना पुन्हा करारावर घेण्याचे काम सुरू आहे. येत्या दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही अडचणींमुळे या प्रक्रियेला उशीर होत आहे.- डॉ. वसंत रामटेके, मुख्य प्रकल्प संचालक, समतादूत, बार्टी