शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी ७५ जाती प्रतीक्षेत

By admin | Updated: August 27, 2015 02:56 IST

गुजरातमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून पटेल समाजाचे आंदोलन पेटले असताना महाराष्ट्रात तब्बल ७५ जाती आरक्षण मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर अनेक जातींना आपला

-  यदु जोशी, मुंबई गुजरातमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून पटेल समाजाचे आंदोलन पेटले असताना महाराष्ट्रात तब्बल ७५ जाती आरक्षण मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर अनेक जातींना आपला प्रवर्ग बदलून हवा आहे. त्याचवेळी मागासवर्ग आयोगावरील सदस्यांची नियुक्ती रखडली आहे. न्या. भाटिया अध्यक्ष असलेल्या या आयोगावर सहा महसुली विभागांतून प्रत्येकी एक आणि एक समाजशास्रज्ञ अशा सात सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारने अद्याप केलेली नाही. आधीच्या सदस्यांची मुदत ३१ डिसेंबर २०१४ रोजीच संपली. आयोगाकडे एखाद्या जातीचा आरक्षणासाठी अर्ज आल्यानंतर आयोगाचे सदस्य त्या जातीसमूहात जाऊन सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाची चौकशी करतात आणि अहवाल देतात. त्या अहवालाच्या आधारे आयोगाचे सदस्य विशिष्ट प्रवर्गात विशिष्ट जातीला समाविष्ट करायचे की नाही, यासाठी याची शिफारस सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांकडे करतात. सचिव मग तो अहवाल मंत्र्यांकडे सोपवितात आणि मंत्र्यांकडून तो मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे जातो. उपसमितीची शिफारस राज्य मंत्रिमंडळाकडे जाऊन मग अंतिम निर्णय घेतला जातो. राज्य मागासवर्गाकडे सध्या ज्या ७५ जातींचे अर्ज प्रलंबित आहेत, त्यांचे अर्ज २००२ ते २०१४ या काळातील आहेत. याचा अर्थ काही जातींना तब्बल एक तपाहून अधिक काळापासून आयोग आणि सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. आयोगाचा अधिकारएखाद्या जातीचा समावेश विशिष्ट प्रवर्गात करावा, अशी शिफारस आयोगाने केली तर ती सामान्यपणे सरकारने स्वीकारावी, असा नियम आहे. पण ती शासनाला स्वीकारायची नसेल तर त्यासाठी ठोस कारणे आणि आकडेवारी देणे सरकारवर बंधनकारक आहे. आयोगाने शिफारस केलेली नसेल तर सरकारला आपल्या अखत्यारीत आरक्षण देता येत नाही.७४ ओबीसी जातींना प्रवर्ग बदलून हवायराज्यात इतर मागासवर्गीयांमध्ये (ओबीसी) एकूण ३५५ जातींचा समावेश आहे.त्यातील ७४ जातींना ओबीसी हा प्रवर्ग सोडायचा आहे. आम्हाला भटक्या-विमुक्त जमाती प्रवर्गात समाविष्ट करा, अशी त्यांची मागणी आहे. भटक्या-विमुक्तांच्या ५१ जाती असून, त्यातील २७ जातींना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी आहे.