शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वायकर-निरुपम वाद पेटला

By admin | Updated: July 12, 2016 03:50 IST

आरे येथील कथित अनधिकृत व्यायामशाळा तसेच जोगेश्वरी येथील एसआरएविषयी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पुराव्याशिवाय केवळ बिनबुडाचे आरोप केले आहेत

मुंबई : आरे येथील कथित अनधिकृत व्यायामशाळा तसेच जोगेश्वरी येथील एसआरएविषयी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पुराव्याशिवाय केवळ बिनबुडाचे आरोप केले आहेत. निरुपम यांनी १५ दिवसांत जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांच्यावर १० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा शिवसेना आमदार व गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. वायकर म्हणाले की, आमदार निधीतून आरे येथील व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. त्यातून आर्थिक लाभ घेतला नाही. व्यायामशाळेचे व्यवस्थापन करणारी संस्था १९९४पासून नोंदणीकृत आहे. येथे ४० खोल्या बांधल्या, २० एकर जागा हडपली, असे खोटे आरोप निरुपम यांनी केले. मात्र, पत्रकारांनाही या ४० खोल्या आढळल्या नाहीत. निरुपम यांनी एकतर आरोप सिद्ध करावेत अन्यथा जाहीर माफी मागावी, असे आव्हान वायकर यांनी दिले. एसआरए प्रकल्पाच्या कंपनीतून मी २०११ सालीच बाहेर पडलो. याबाबतची माहिती निवडणुकीच्या शपथपत्रात दिल्याचे वायकर यांनी स्पष्ट केले. निरुपम यांना कार्यालयात आणि घरी कायदेशीर नोटीस बजावल्याचे वायकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)