शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीचा मारेकरी मोकाट !

By admin | Updated: January 29, 2017 21:03 IST

पंधरा दिवसांपूर्वी खापा या एकाच वन परिक्षेत्रात एक वाघीण, दोन बिबटे आणि दोन हरणांच्या शिकारीच्या घटना पुढे आल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - मागील पंधरा दिवसांपूर्वी खापा या एकाच वन परिक्षेत्रात एक वाघीण, दोन बिबटे आणि दोन हरणांच्या शिकारीच्या घटना पुढे आल्या आहेत. यानंतर प्राथमिक चौकशीतून बिबट्यांवर विषप्रयोग आणि वाघिणीला विजेचा शॉकदेऊन ठार केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला. मात्र यानंतर वनविभाग अचानक गप्प झाला असून, वाघिणीचा मारेकरी खुलेआम मोकाट फिरत आहे. एवढेच नव्हे, तर खापा वन परिक्षेत्रातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरूद्ध सुद्घा कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे एकूणच नागपूर वन विभागाच्या भूमिकेवर संशयव्यक्त केला जात आहे.मागील १० जानेवारी रोजी खापा वन परिक्षेत्रात दोन बिबट्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्या बिबट्यांवर विषप्रयोग झाला होता. यानंतर लगेच १३ जानेवारी रोजी पुन्हा एक वाघीण आणि दोन हरणांचा मृतदेह आढळून आला होता. या सर्व प्राण्यांची विजेच्या शॉकने मृत्यू झाला होता. चौकशीत एका शेतकऱ्याने आपल्या शेतात ते विजेचे तार लावले असल्याचे आढळून आले होते.त्यावर संबंधित आरोपीविरूद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. मात्र यानंतर खापा येथील वन परीक्षेत्र अधिकारी तागडे यांनी कधीही त्या आरोपीला गजाआड करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे घटनेला तब्बल पंधरा दिवसापेक्षा अधिकचा कालावधी लोटून सुद्धा अजूनपर्ययंत आरोपी हाती लागलेला नाही. माहिती सूत्रानुसार आरोपी याच संधीचा फायदा घेवून खुलेआम जामिनासाठी मोकाट फिरत असल्याची माहिती पुढे आली आहे.