शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबातील वाघ टपाल तिकिटावर

By admin | Updated: July 27, 2016 01:18 IST

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन येत्या २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्रदिनी होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन येत्या २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्रदिनी होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता. ताडोबाच्या जंगलातील एक वाघीण आपल्या बछड्यावर माया करत असतानाचे हे छायाचित्र चंद्रपूरच्या अमोल बैस या तरुण हौशी वन्यजीव छायाचित्रकाराने टिपले. या छायाचित्रातून प्रगट होणारे ममत्व लक्षात घेत वनमंत्री मुनगंटीवार यांनी या छायाचित्राचे टपाल तिकीट प्रकाशित व्हावे, यासाठी केंद्रीय संचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली. या छायाचित्रासह ताडोबा अभयारण्याचे महत्त्व व तेथील व्याघ्र वैभवाचा सविस्तर तपशील त्यांनी रविशंकर प्रसाद यांना सादर केला. सतत पाठपुरावा केल्याने आता टपाल तिकीट प्रकाशित होत आहे. (प्रतिनिधी)यापूर्वीही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करून तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज, १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सरकारशी झुंज देत शहीद झालेले क्रांतिवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके, आनंदवनाच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांच्या जीवनात आनंद फुलविणारे थोर समाजसेवक कर्मयोगी बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशनासाठी यशस्वी प्रयत्न केले होते.