शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वडापाव दुकानदाराला उल्हासनगरमध्ये जिवंत जाळले

By admin | Updated: March 21, 2017 04:14 IST

वडापावविक्रीचे स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान ‘महालक्ष्मी जम्बो वडापाव’ दुकानदार चंदू रामरख्यानी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात झाले.

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात समोरासमोर वडापावविक्रीचे स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान ‘महालक्ष्मी जम्बो वडापाव’ दुकानदार चंदू रामरख्यानी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात झाले. रामरख्यानी हे ९० टक्के भाजले असून, त्यांना नवी मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. रामरख्यानी यांना जाळण्याचा प्रयत्न करणारा सुरेश आहुजा हा फरार झाला आहे.उल्हासनगर कॅम्प नं. ४, रेल्वे स्टेशनबाहेर रामरख्यानी यांनी दुकान भाड्याने घेऊन वडापाव सेंटर सुरू केले. यापूर्वी सुरेश आहुजा याने हे दुकान भाड्याने घेऊन वडापावचा धंदा केला होता. महालक्ष्मी सेंटरसमोर आहुजा याचे नवीन वडापाव दुकान मंगळवारपासून सुरू होण्याची कुणकुण रामरख्यानी यांना लागली होती. याबाबत, आक्षेप घेतल्याने सुरेश व रामरख्यानी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या रागातून सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आहुजाने बाटलीतून आणलेले पेट्रोल रामरख्यानी यांच्या अंगावर टाकून त्यांना पेटवून दिले. भरदिवसा घडलेल्या या अमानुष घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रामरख्यानी हे ९० टक्के भाजले असून, त्यांच्यावर सुरुवातीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची तब्येत गंभीर असल्याने त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांनी दिली. आरोपी आहुजा हा फरार झाला आहे. उल्हासनगरात दोन दिवसांपूर्वी दारुड्या जावयाने घर आतून बंद करून सासूसह पत्नी, मेहुणी, भाची यांना मारहाण करून ठार मारण्याच्या हेतूने घर पेटवून दिले होते. (प्रतिनिधी)