शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाडा स्टॅण्ड २१ वर्षे पडून

By admin | Updated: May 17, 2016 04:27 IST

२१ वर्षानंतरही हे ते वापरात नसल्याने धूळ खात पडून असून त्यामुळे एस. टी. महामंडळाचा लाखो रुपये खर्च वाया गेला

वसंत भोईर,

वाडा- या शहरातील मुख्य बाजारपेठेलगत असलेले जुने बसस्थानक अपुरे पडत असल्यामुळे प्रवाशांची व बस चालक, वाहक यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन सन १९९५ साली मनोर महामार्गालगत व वाड्यापासून सुमारे दीड कि. मी. अंतरावरील प्रशस्त जागेत लाखो रु पये खर्च करून सुसज्ज असे बसस्थानक बांधण्यात आले. मात्र २१ वर्षानंतरही हे ते वापरात नसल्याने धूळ खात पडून असून त्यामुळे एस. टी. महामंडळाचा लाखो रु पये खर्च वाया गेला आहे. वाडा गावाच्या मुख्य बाजार पेठेलगत जुने बसस्थानक आहे. हे बसस्थानक अत्यंत कमी जागेत असल्यामुळे बस गाड्या पुढे मागे घेताना चालक व वाहकांना प्रचंड त्रास होतो व वाहतूककोंडी होते अपघातही घडतात शिवाय प्रवाशांचीही अत्यंत गैरसोय होते हे लक्षात घेऊन महामंडळाने सन १९९५ साली सुमारे १३ एकर जागेवर आगाराची निर्मिती केली. या भूखंडाचे दोन विभाग करण्यात आले. त्यापैकी सहा एकरात बसस्थानक व सात एकरात आगार करण्यात आले. बसस्थानकाची इमारत ( शेड ) सुद्धा त्यावेळी लाखो रु पये खर्च करून बांधण्यात आली. मात्र त्यावेळी हे बसस्थानक गावापासून दूर असल्याने तिथे जाण्यास नागरिकांनी विशेषत: व्यापा-यांनी प्रखर विरोध केला त्यामुळे जुनेच बसस्थानक कायम ठेवले गेले व नवीन बसस्थानक पडून राहिले. सद्यस्थितीत वाडा - मनोर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाले आहे. या मार्गाला लागूनच नवीन बसस्थानक आहे. तसेच वाडा न्यायालयाची इमारत त्याच प्रमाणे रहिवाशी वसाहती या आगाराच्या आजूबाजूला झालेल्या आहेत. त्यामुळे येथील लोकवस्ती वाढली आहे. शिवाय या पंचक्र ोशीत वाढत असणारी औद्योगिक वसाहत या सर्वकष वस्तुस्थितीचा विचार करता वाडा आगाराला लागून असलेले नवीन बसस्थानक सुरू करणे अत्यावश्यक ठरणार आहे. नवीन बसस्थानकात विस्तीर्ण अशी जागा असल्याने ती वापरात येऊन गाड्यांची सोय करणे चांगले होईल इतर आगाराच्या वाड्याहून जाणार्या बसगाड्या वाडा बस स्थानकात थांबल्याने गाड्यांच्या गदीॅत वाढ होते अशा बाहेरील आगार विभागाच्या गाड्या प्रथम आगारानजीकच्या प्रस्तावित नवीन बसस्थानकावर येतील तेथे त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे थांबा घेऊन त्या सध्याच्या स्थानकावरून नोंद करून मार्गस्थ होतील. ठाणे, पालघर, बोईसर, जव्हार, डहाणू कडे जाणाऱ्या गाड्या ह्या जुन्या स्थानकावर नोंद करून त्वरीत प्रस्तावित बसस्थानकात येऊन त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबा घेतील. वाडा आगाराच्या ग्रामीण भागात चालणाऱ्या सर्व फेऱ्या सध्याच्या पध्दतीप्रमाणे व पंचक्र ोशीतील मागणी येईपर्यंत जुन्या बसस्थानका वरून मार्गस्थ होतील. त्यामुळे बाजारपेठेतील वाहतूकीची कोंडी कमी होईल. अनेक शहरात जवळ जाणाऱ्या गाड्यांसाठी छोटे बसस्थानक व लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठी विस्तृत नवे बसस्थानक आहे. असा प्रयोग ठाणे, नाशिक, पुण्यात यशस्वी झाला आहे. तसाच तो वाडा येथे करायला काय हरकत आहे?