शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेच्या सात जागांसाठी मतदानाची वेळ संपली

By admin | Updated: December 27, 2015 18:27 IST

विधानपरिषदेच्या सात जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेच्या एकूण आठ जागा होत्या.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २७ -  विधानपरिषदेच्या सात जागांसाठी मतदानाची वेळ संपली आहे.  विधानपरिषदेच्या एकूण आठ जागा होत्या. मात्र नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेतून भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांची बिनविरोध निवड झाल्याने सात जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत खरी चुरस मुंबईतील दोन जागांसाठी आहे. 
शिवसेनेकडून रामदास कदम आणि काँग्रेसकडून भाई जगताप रिंगणात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद लाड बंडखोरी करुन निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे दुस-या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. संख्याबळामुळे शिवसेनेला रामदास कदम यांच्या विजयाची खात्री आहे मात्र लाड यांच्या उमेदवारीमुळे भाई जगताप यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुपारपर्यंत मुंबईत २०३ पैकी १९० सदस्यांनी मतदान केले होते. 
मनसेने या निवडणुकीत तटस्थ रहाण्याची भूमिका घेतली आहे. अपक्ष उमेदवारामुळे घोडेबाजार मोठया प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतून दोन, कोल्हापूर, धुळे-नंदूरबारमधून प्रत्येकी एक, अहमदनगरमधून एक, वाशिम आणि सोलापूरमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक होत आहे. 
स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उमेदवार निवडून विधानपरिषदेवर पाठवणार आहेत. नुकसान टाळण्यासाठी शिवसेना-भाजपने युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. अहमदनगरमध्ये विद्यमान आमदार अरुण जगताप (राष्ट्रवादी) आणि युतीकडून प्रा. शशिकांत गाडे (शिवसेना) रिंगणात आहेत. धुळेसाठी काँग्रेसचे अमरिशभाई पटेल व भाजपाचे शशिकांत वाणी यांच्यात लढत होत आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील व भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांच्यात थेट लढत होत आहे. 
सोलापूरमध्ये आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार दीपक साळुंखे व भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांच्यात चुरस आहे. अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघात युतीचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरीया व काँग्रेस-राष्ट्रवादीचे रवींद्र सपकाळ यांच्यात सरळ लढत होत आहे.
 
विधानपरिषदेच्या सात जागांपैकी एका जागेसाठी आज अकोला, वाशिम, बुलडाणा  स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून मतदान झाले. बुलडाणा जिल्ह्यातील ३८० मतदारांपैकी ३७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, त्याची टक्केवारी ९९.२ इतकी आहे. खामगाव मतदान केंद्रावर तीन मतदारांनी मतदान केले नाही. बुलडाणा जिल्ह्यात १३ मतदारन केंद्रावर मतदान शांततेत पार पडले.