शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एक नगरपरिषद, 3 नगरपंचायती व धारणी पंचायत समितीसाठी 24 मे रोजी मतदान

By admin | Updated: April 21, 2017 19:47 IST

नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच विविध 18 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांबरोबरच धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील 24 मे रोजी मतदान घेण्यात येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
 सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा  व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 मे रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 11 मेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयापासून तीन दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 24 मे  रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 26 मे  रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
जिल्हानिहाय नगरपरिषद व नगरपंचायतींच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुका पालघर: जव्हार- 1 क, 3 ब, 4अ, 4 ब व 4 इ, रायगड: मुरुड जंजिरा- 7 अ आणि श्रीवर्धन- 6 अ, रत्नागिरी: चिपळूण- 9 अ, सिंधुदुर्ग: कसई दोडामार्ग- 7, सातारा: मेढा- 3, सोलापूर: दुधनी- 2 अ, नाशिक: देवळा- 14, जळगाव: यावल- 1 ब, नंदुरबार: धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु.- 11, नंदुरबार- 2 क, उस्मानाबाद: उस्मानाबाद- 11 ब, लातूर: औसा- 10 अ आणि अमरावती: अचलपूर- 19 ब.
   ‘धारणी’चा निवडणूक कार्यक्रम
धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4 मे ते 9 मे या कालावधीत नामनिर्देनपत्रे दाखल करता येतील. 11 मे रोजी नामनिर्देनपत्रांची छाननी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे 14 मेपर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 16 मे  हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक असेल. अपील असलेल्या ठिकाणी 19 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान केंद्रांची यादी 18 मे रोजी प्रसिद्ध केली जाईल. 24 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची मुदत असेल. 26 मे रोजी मतमोजणी होईल.