शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रांच्या स्थलांतरामुळे मतदारांची होणार दमछाक

By admin | Updated: October 15, 2014 04:07 IST

कल्याण पश्चिम मतदारसंघातील ३१ मतदान केंद्रांचे सुविधांअभावी स्थलांतर करण्यात आले आहे.

कल्याण : कल्याण पश्चिम मतदारसंघातील ३१ मतदान केंद्रांचे सुविधांअभावी स्थलांतर करण्यात आले आहे. परंतु, निवडणूक विभागाने दिलेल्या व्होटर स्लीपवर जुन्याच मतदान केंद्रांचे पत्ते छापल्याने मतदारांमध्ये संभ्रम पसरला आहे. त्यात काही केंद्रे दूरवर गेल्याने मतदारांची चांगलीच दमछाक होणार आहे.येथील पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण ३६६ मतदान केंद्रे आहेत. यातील काही केंद्रांच्या इमारती या धोकादायक असल्याने तसेच त्या ठिकाणी योग्य त्या सुविधा नसल्याने आधारवाडी, वाडेघर आणि चिकणघर या परिसरांतील केंद्रांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आधारवाडी येथील श्री कॉम्प्लेक्स येथे वाडेघर येथील केंद्र वायलेनगर आणि आग्रा रोडवरील मोहिंदरसिंग हायस्कूल तर चिकणघर परिसरातील केंद्र बिर्ला महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. जुन्या आणि नव्या मतदान केंद्रांमध्ये एक ते दीड किमीचे अंतर असल्याने मतदारांची नव्या केंद्रांवर पोहोचताना दमछाक होणार आहे. निवडणूक विभागाने पुरविलेल्या व्होटर स्लीपवर जुन्या केंद्राचा पत्ता दिला गेल्याने मतदारांमध्ये संभ्रम आहे. याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. अंतिम टप्प्यात मतदान केंद्रे बदलण्याचा निर्णय घ्यावा लागल्याने व्होटर स्लीपवरील पत्ता बदलण्यास अवधी मिळाला नाही, जुन्या केंद्राच्या ठिकाणी नव्या केंद्राची सूचना लावण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या पश्चिम विधानसभा कार्यालयातून देण्यात आली. (प्रतिनिधी)