शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मतदार ‘जन्नत’ पाहून आले जमिनीवर...

By admin | Updated: December 28, 2015 01:06 IST

विधान परिषद सहल : उमेदवारांकडून आई-वडिलांनी केली नसेल इतकी सेवा...

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीनिमित्त दोन्ही उमेदवारांनी आपले मतदार चार-पाच दिवस सहलीवर पाठविले होते. तेथे त्यांचे पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे, विमान प्रवास, मनाप्रमाणे शॉपिंग, फिरण्यासाठी आलिशान चारचाकी गाडी, तसेच सायंकाळी मालिशसाठी स्वतंत्र व्यवस्था, आदी शाही बडदास्त ठेवली होती. त्यामुळे मतदार भलतेच खूश झाले होते. रविवारी हे सर्व मतदार ‘शाही’ सहलीवरून कोल्हापुरात मतदान केंद्रावर परतले. त्यानंतर, आमच्या बालपणी आई-वडिलांनीही सेवा केली नसेल इतकी सेवा या उमेदवार व समर्थकांनी केल्याची भावना एका नगरसेवक मतदाराने यावेळी व्यक्त केली. याच प्रकारचा सूर सहलीवरून परतलेल्या बहुतांश नगरसेवकांचा होता. काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी सहलीस पाठविलेल्या महानगरपालिकेतील नगरसेवकांसह जिल्हा परिषदेचे सदस्य, तसेच नगरपालिकेतील काही सदस्य राज्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी विमान प्रवास करीत हिल स्टेशन पार करीत होते. हीच परिस्थिती बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांच्याही बाबतीत होती. त्यांनीही आपल्या गटाच्या मतदारांना विमानाने सहलीवर पाठविले होते. विशेष म्हणजे दोन्हीही गटांकडून सदस्यांना सहकुटुंब सहलीवर नेले होते. गेल्या दहा दिवसांपासून या मतदारांची वेगवेगळ्या गटांकडून शाही बडदास्त राखली जात होती. पंचतारांकित हॉटेलमध्ये मागेल ते खाण्यासाठी मिळत होते; तर त्यांना ज्या हिल स्टेशनवर नेले जात होते, तेथेही खरेदी करण्यासाठी आलिशान कार उपलब्ध करून दिली जात होती; पण ते मतदार व त्यांच्या कुटुंबीयांवर नजर ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत दोन बॉडीगार्डही दिले जात होते. अक्षरश: महिला मतदारांना नवीन पर्स घेण्यासाठीही पैसे देण्यात आले. मतदारांनी कपडे, साड्यांचीही खरेदी केली; पण त्यांचे पैसे भागविण्याची वेळही उमेदवारांवरच आली.दहा नगरसेवकांची प्रकृती बिघडलीसहलीदरम्यान मतदारांवर दिवसभर ओल्या पार्टीची खैरात होत होती. उठल्यापासून झोपेपर्यंत जे मागेल ते मिळत होते. फुकटचे मिळते म्हणून दिवसभर ‘खाण्या-पिण्यावर’च ताव मारीत होते. परिणामी, एका गटाच्या सहलीतील दहा मतदारांची प्रकृती पूर्णत: खालावली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागल्याचे समजते. त्याचा खर्च उमेदवारांनी भागविला असला तरी अद्याप या मतदारांची प्रकृती पूर्ण बरी झालेली नाही; पण आता मतदान झाल्याने उपचारांचा खर्च स्वत: करावा लागणार आहे. ‘१०:१५:२०’ चा फॉर्म्युला!निवडणुकीत नेमके मतदारांना किती पैसे पदरात पडले, याविषयी कमालीची उत्सुकता आहे. काही नगरसेवकांना प्रत्येकी १० लाख, काहींना १५ लाख, तर संदिग्धता असलेल्या इचलकरंजी व शिरोळमधील मतदारांना २० लाख रुपये दिल्याचे समजते.