शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

यादीतील घोळामुळे उमेदवारांसह मतदारही गोंधळात

By admin | Updated: January 30, 2017 19:56 IST

प्रभाग फेररचनेमुळे केवळ विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारच नव्हे तर मतदारांच्या गोंधळातही भर घातली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 -  प्रभाग फेररचनेमुळे केवळ विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारच नव्हे तर मतदारांच्या गोंधळातही भर घातली आहे. शहरातील लोकसंख्या उपनगरात स्थलांतरीत झाल्यामुळे त्यानुसार प्रभागांच्या सीमा रेषा बदलण्यात आल्या आहेत. यामुळे मतदार याद्यांमध्येही मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. याचा परिणाम मतदानावरही होणार असल्याने उमेदवार अस्वस्थ आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून ही निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक प्रभागात ५० ते ६० हजार लोकसंख्या ठेवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. परंतु वरळी येथील प्रभाग क्र. १९४ मध्ये लोकसंख्या आणि मतदारांच्या आकडेवारीत गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. ५८ हजार लोकसंख्या असलेल्या या प्रभागात ६१ हजार ८२५ मतदार नोंदविण्यात आले आहेत. हा घोळ प्रत्यक्ष महापालिकेच्या संकेतस्थळावरच दिसून येत असल्याची तक्रार म्हात्रे यांनी केली आहे. तसेच दहिसर येथील प्रभाग क्र. १ मध्ये लोकसंख्या ४९ हजार ९४० तर मतदार अवघे २४ हजार ७९३ नोंदविण्यात आले आहेत, असा गोंधळ अन्य प्रभागांमध्येही उडाला असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम संपूर्ण मतदान प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूकच रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. असे आहेत काही घोळ मतदाराचे नाव एका प्रभागात आणि मतदानाचा अधिकार दुसऱ्या प्रभागात अशा तक्रारी प्रामुख्याने पुढे आल्या आहेत. यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी आधी आपले नाव कुठल्या मतदार यादीत आहे याचा शोध घ्यावा लागेल. - प्रभाग क्रमांक १९२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर को.आॅप. सो. 1 ते 4, बोहरी चाळ, केसरी चाळ, दूधवाला चाळ क्र. 1 व 2, खापरी देव झोपडपट्टी संघ, दळवी नगर दादर स्थानक हे ठिकाणी मतदार यादीचा गोंधळ आहे. - शीतल म्हात्रे यांचा भाऊ हार्दिक म्हात्रे हा कॅनेडियन नागरिक आहे. मतदान ओळखपत्र मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला नव्हता. त्यांच्या नावाने ओळखपत्र देण्यात आले आहे. घरच्या पत्त्यावर हे ओळखपत्र पाठविण्यात आले असून त्यात आडनावाचाही घोळ आहे. त्यांचे नाव म्हात्रेऐवजी मेहता असे यादीत आले आहे. - निवडणुकीत 50 टक्क्यांहून कमी मतदान होते. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृती सुरू केली आहे. यासाठी मतदान केंद्र प्रत्येक एक किमीच्या अंतरावर असणार आहे. मात्र मतदार यादीतील गोंधळामुळे मतदारांची गैरसोय होऊन त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. - 4 फेब्रुवारीपर्यंत मतदार यादीतील चूक सुधारता येईल. अंतिम मतदार यादी 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.