शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार निवारण्यासाठी पंचायत समिती स्तरावरही ‘व्हॉटस अ‍ॅप’ क्रमांक !

By admin | Updated: March 2, 2017 18:15 IST

तक्रारींचे निवारण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात आता पंचायत समिती स्तरावरही ‘व्हॉटस अ‍ॅप’ क्रमांक उपलब्ध करून दिला जात आहे.

वाशिम, 02 : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात आता पंचायत समिती स्तरावरही ह्यव्हॉटस अ‍ॅपह्ण क्रमांक उपलब्ध करून दिला जात आहे. पंचायत समितीच्या कक्षेतील संबंधित समस्यांबाबत या क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे.ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. गावपातळीवर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय केंद्र, लघु सिंचन विभागाचे जलप्रकल्प, पाणीपुरवठा योजना, वैयक्तिक लाभाच्या विविध योजना आदींसंदर्भात नागरिकांना नानाविध गैरसोयींना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही समस्या किंवा तक्रारीचे निवारण झाले नाही तर संबंधित लाभार्थीला  नाईलाजाने जिल्हा परिषदेचे संबंधित विभाग प्रमुख किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन द्यावे लागते. यामध्ये वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी यापूर्वी जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर ह्यव्हॉट्स अ‍ॅपह्ण क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे. सुरूवातीला या क्रमांकावर नागरिकांनी तक्रारीही नोंदविल्या. त्यानंतर  या क्रमांकावर तक्रारींचा ओघ कमी झाला. ही बाब लक्षात घेऊन आता पंचायत समिती स्तरावर तक्रार निवारणासाठी स्वतंत्र ह्यव्हॉटस अ‍ॅपह्ण क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. ह्यव्हॉटस अ‍ॅपह्ण क्रमांकावरील प्राप्त तक्रारींची नोंद करणे आणि सदर तक्रार संबंधित विभाग प्रमुखाकडे वळती करण्याची जबाबदारीही कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. शौचालय व घरकुल योजनेचे अनुदान, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना यासह ग्रामपंचायत व पंचायत समितीशी संबंधित एखाद्या प्रलंबित कामांची तक्रार नोंदविता येणार आहे. या तक्रारींचे निराकरण संबंधित विभाग प्रमुखांकडून केले जाणार आहे. गावपातळीवरील शाळा, आरोग्य केंद्र, समाजकल्याण विभागाचे वसतिगृह, पशू दवाखाना, ग्रामसेवक, शिक्षक यासह जिल्हा परिषदेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी दांडी मारली असेल तर नागरिकांना याबाबतची तक्रार या क्रमांकावर नोंदविता येणार आहे. यासाठी संबंधितांना स्वत:च्या नावाचा उल्लेख करावा लागणार आहे.