शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

विठ्ठू माऊली तू..

By admin | Updated: July 8, 2014 23:27 IST

पुणो-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 जवळ पुरंदर, हवेली, दौंड या तालुक्यांच्या सीमेवर डाळिंब या गावी अंदाजे 400 वर्षापूर्वीचे पुरातन विठ्ठल मंदिर आहे.

 उरुळी कांचन : पुण्यापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर पुणो-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 जवळ पुरंदर, हवेली, दौंड या तालुक्यांच्या सीमेवर डाळिंब या गावी अंदाजे 400 वर्षापूर्वीचे पुरातन विठ्ठल मंदिर आहे. या ठिकाणी श्री विठ्ठलाची स्वयंभू शिळा आहे. जागृत स्वयंभू शिळा ठिकाण तसेच ठेवून पंढरपूरच्या हुबेहूब विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी साकारली आहे. या मंदिराच्या पश्चिम बाजूला शंकराचे पुरातन मंदिर आहे. मंदिरासमोर दोन दीपमाला व दोन नंदी असल्याने या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. श्री विठ्ठल मंदिरासमोर पुरातन एक लिंबाचे व दोन चिंचेची खूप जुनी झाडे आहेत.  दक्षिणोस विहीर व पाझर तलाव आहे. 

 
पूव्रेस वाहणारा ओढा व चारही बाजूंना 35 एकरांमध्ये विविध प्रकारच्या झाडाझुडपांचे, वृक्षांचे वन आहे. लोकवस्तीपासून दूर एक किलोमीटर अंतरावर झाडीमध्ये श्री विठ्ठलाचे मंदिर आहे. म्हणून या ठिकाणाला बनातील विठोबा, असे संबोधले जाते. पुरातन काळापासून श्री चांगावटेश्वराची पालखी सासवड येथून पंढरपूरला जाताना या ठिकाणी दुपारच्या विसाव्यासाठी थांबते. वर्षभरातील सर्व सण या ठिकाणी मोठय़ा उत्साही वातावरण साजरे केले जातात. आषाढी एकादशी यात्रेस या ठिकाणी लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. पुरातन काळातील हे ठिकाण जागृत देवस्थान असून, पंचक्रोशीतील प्रति-पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे.
अशा निसर्गरम्य पुरातन श्री विठ्ठल मंदिराचा विश्वस्त कमिटीच्या वतीने जीर्णोद्धार करण्यात आला असून, जुने मंदिर तसेच ठेवून, जुने शिखर काढून नवीन शिखर बनवून त्यामध्ये 51 विविध देवतांच्या मूर्ती बनवल्या आहेत. 
पूर्वी दहा भाविक बसायचे त्या ठिकाणी एक हजार भाविक बसतील, अशा भव्य सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, भाविकांसाठी भक्तनिवास, शौचालय या सोयी करण्यात आल्या आहेत. 
लग्न सोहळ्यासाठी देवस्थानमार्फत मंडप उभा करण्यात आला असून, सर्वसामान्यांसाठी माफक दरात लग्न लावण्यात येते. वर्षभरात जवळपास 1क्क् लग्ने लावली जातात. तसेच सामूहिक लग्ने सोहळे पार पडतात. (वार्ताहर)
 
4या श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पुणो-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरील उरुळी कांचन या ठिकाणी पीएमटी, एसटी बस व रेल्वे थांबतात. पुणो- स्वारगेट येथून पीएमटी बसने व पुणो रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने उरुळी कांचन येथे येता येते व तेथून दक्षिणोस पाच किलोमीटर अंतर खासगी वाहनाने मंदिरार्पयत जाता येते. तसेच, सातारा-भोर-नारायणपूर-सासवड मार्गाने व लोणंद-मोरगाव-जेजुरी येथून वाघापूर चौफुला-श्ंिांदवणो घाटमार्गे शिंदवणो व तेथून दोन किलोमीटर अंतरावर प्रति-पंढरपूर डाळिंब तीर्थक्षेत्रच्या ठिकाणी येता येते.
4विठ्ठल मंदिराचा विकास चांगल्या प्रकारे करून भाविकांसाठी चांगल्या प्रकारच्या सोयी करण्याचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा करून करण्याचा प्रयत्न विश्वस्त मंडळ करत आहे.
4प्रति-पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीविठ्ठल देवस्थान हे पुण्यापासून अवघ्या 35 कि लोमीटरवर व उरुळी कांचनपासून दक्षिणोकडे 5 कि लोमीटर अंतरावर दौंड, हवेली व पुरंदर या तीन तालुक्यांच्या सीमेवर डाळिंब या गावी असून, पंचक्रोशीतील ते श्रद्धास्थान आहे.
 
4पुरातन काळातील विठ्ठल मंदिर हे अंदाजे 4क्क् वर्षापूर्वीचे असून, पूर्वी सर्व बाजूंना काटेरी बाभळीचे बन या ठिकाणी होते, म्हणून या क्षेत्रला ‘बनातील विठोबा’ म्हणून संबोधले जाते. या ठिकाणी विठ्ठलाची स्वयंभू (तांदळा) मूर्ती असून, मंदिराशेजारी एक जुने लिंबाचे झाड व दोन चिंचेची झाडे आहेत. तसेच, त्या काळातील एक बारव आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार
4प्रत्येक आषाढी एकादशीला या ठिकाणी मोठी यात्र भरते. श्रवण महिन्यात मोठय़ा प्रमाणावर सत्यनारायणाच्या महापूजा होत असतात. तसेच, चैत्र महिन्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो. अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. 14 जून 1994 रोजी श्री विठ्ठल देवस्थानला ट्रस्ट म्हणून मान्यता मिळाली.आषाढी एकादशी सन 1994 रोजी तो सोन्याचा दिवस उगवला. दत्ताेबा अण्णा कांचन, तत्कालीन आमदार सुभाष अण्णा कुल, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन समारंभ मोठय़ा थाटामाटात झाला. गावक:यांचा आनंद ओसंडून वाहत होता. भराभर देणगी जमा होऊ लागली. सभामंडपाचे काम पूर्ण झाले. 
 
देवस्थानमुळे डाळिंबचा कायापालट
4आमदार फंडातून व खासदार फंडातून उरुळी कांचन ते विठ्ठल देवस्थान हा रस्ता डांबरीकरण झाला. खासदार फंडातून शाळेसाठी चार खोल्या बांधण्यात आल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. तसेच, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 4क् लाख रुपयांचा दत्तवाडी ते डाळिंब गाव हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला. अशा प्रकारे देवस्थानचा आणि देवस्थानच्या माध्यमातून गावाचा विकास झाला. देवस्थानमुळे डाळिंबचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर चमकू लागले. डाळिंबच्या दृष्टीने सोन्याचा दिवस श्री विठ्ठल मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुमारे 35 लाख रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले.