शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

भारतीयांमध्ये जीवनसत्त्व कमी

By admin | Updated: October 25, 2015 03:34 IST

बारमाही सूर्यप्रकाश मिळणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. देशातील हवामान हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. पण गेल्या तीन वर्षांमध्ये सुमारे १५ लाख व्यक्तींवर

- पूजा दामले,  मुंबईबारमाही सूर्यप्रकाश मिळणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. देशातील हवामान हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. पण गेल्या तीन वर्षांमध्ये सुमारे १५ लाख व्यक्तींवर केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, देशातील १० पैकी ७ व्यक्तींमध्ये जीवनसत्त्वांची कमतरता आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईसह राज्याचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातील ८०.३० टक्के लोकांमध्ये जीवनसत्त्वाचा अभाव असल्याचा निष्कर्ष अभ्यासांती काढण्यात आला आहे.गेल्या तीन वर्षांमध्ये या अभ्यासासाठी १४ लाख ९६ हजार ६८३ लोकांची जीवनसत्त्वाची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये ड जीवनसत्त्व, बी १२ जीवनसत्त्व आणि बी ९ जीवनसत्त्वाची (फॉलिक अ‍ॅसिड) तपासणी करण्यात आली होती. हा अभ्यास देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम विभागांमध्ये करण्यात आला होता. या चारही विभागांचा एकत्रित अभ्यास केल्यावर ७५ टक्के लोकसंख्येमध्ये जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले होते. जीवनसत्त्वाचा मेट्रोपॉलिसने केलेल्या अभ्यासात, ८१.२८ टक्के नमुन्यांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले. तर २१.०२ टक्के नमुन्यांमध्ये बी १२ जीवनसत्त्वाची आणि १५.०६ टक्के नमुन्यांमध्ये बी ९ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. सोनाली कोल्ते यांनी सांगितले की, भारतीय लोक हे जीवनसत्त्वांकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. जीवनसत्त्वे एकदम कमी होत नाहीत. ही प्र्रक्रिया कित्येक महिने आणि वर्षांपासून हळूहळू घडत असते. शरीरातील जीवनसत्त्वे कमी झाल्यावर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. पण वेळीच जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे निदान झाल्यास लक्षणांवर नियंत्रण आणता येते. त्यामुळे पुढे होणारी आरोग्याची हानी टाळता येते.२० ते ४० वयोगटातील व्यक्तींमध्ये सर्वच जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचे प्रमाण अधिक आहे, असाही हा अभ्यास म्हणतो. या वयोगटातील व्यक्तींमध्ये ड जीवनसत्त्व कमी असण्याचे प्रमाण ८३.५० टक्के इतके आहे, तर २१.६८ टक्के व्यक्तींमध्ये बी १२ जीवनसत्त्वाची आणि २४.५३ टक्के व्यक्तींमध्ये बी ९ जीवनसत्त्वाची कमतरता आहे. पश्चिम विभागातील ८२.०६ टक्के पुरुषांमध्ये तर ७८.५४ टक्के महिलांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता आहे. तर २३.८९ टक्के पुरुषांमध्ये आणि १५.४३ टक्के महिलांमध्ये बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता आहे आणि बी ९ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे प्रमाण पुरुषांमध्ये १७.५१ टक्के तर महिलांमध्ये ९.२५ टक्के इतके आहे. (प्रतिनिधी)ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणेसांधेदुखी, स्नायू कमकुवत होणे, अशक्तपणा, हाडांमध्ये वेदना, थकवा, निरुत्साही वाटणे, वजन कमी होणे ड जीवनसत्त्वाचे प्रमुख स्रोत ड जीवनसत्त्व हे प्रामुख्याने सूर्यप्रकाशातून मिळते. अथवा औषधांमधून ड जीवनसत्त्व मिळू शकते. बी १२ जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणेअशक्तपणा, उदासीनता, विस्मरण, अ‍ॅसिडीटी, वजन कमी होणे, मळमळ, उलट्यांचा त्रास, रक्तक्षय, आभासीपणा,श्वसनाचा त्रासप्रमुख स्रोत : मांस, मासे, चिकन, अंडी, दुग्धजन्य पदार्थ फॉलिक अ‍ॅसिड आवश्यकबी ९ जीवनसत्त्व हे सामान्यत: फॉलिक अ‍ॅसिड या नावाने ओळखले जाते. हे पाण्यात विरघळणारे असून ते बी जीवनसत्त्वाच्या गटातील आहे. फॉलिक अ‍ॅसिड हे शरीराच्या प्रमुख अवयवांच्या कार्यासाठी उपयोगी असते. उदा - डीएनए, आरएनए, पेशींची जलद विभागणी करणे, पेशींचा विकास करणे, निरोगी रक्तपेशींची निर्मिती करणे. गर्भवती महिलांसाठी बाळाचा मेंदू किंवा पाठीचा कणा (मज्जातंतूमधील दोष, पाठीच्या कण्यातील दोष) यातील जन्मजात दोष टाळण्यासाठी पुरेसे फॉलिक अ‍ॅसिड घेणे आवश्यक आहे.२० ते ४० वयोगटातील व्यक्तींमध्ये सर्वच जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचे प्रमाण अधिक आहे.