शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाहुणी म्हणून आलेली आई निष्ठूर बनून गेली !

By admin | Updated: July 26, 2016 22:47 IST

रक्ताची माणसं नाती विसरतात, तेव्हा समाजातील माणसं ती जोडतात.

 अजय जाधव/ऑनलाइन लोकमत

उंब्रज ( सातारा ), दि. 26 - रक्ताची माणसं नाती विसरतात, तेव्हा समाजातील माणसं ती जोडतात. माणुसकी संपत चाललीय अशी ओरड होत असतानाच हे खोटं ठरविणारी घटना उंब्रजमध्ये घडली. पाहुणी म्हणून आलेली आई पोटच्या गोळ्याला सोडून गेली. तेव्हा तिचा शोभा कांबळे यांनी माँ बनून सांभाळ केला. याबाबत माहिती अशी की, येथील बाजारपेठेत शोभा कांबळे या अनेक वर्षांपासून केळी विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवार १४ रोजी त्या नेहमीप्रमाणे केळी विकत असताना सायंकाळी सातच्या सुमारास भुकेने व्याकूळ झालेली एक महिला दोन वर्षांच्या मुलासह शोभा यांच्याकडे आली. ती स्वत:चं नाव कोमल शिंदे असे सांगत होती. तर मुलाचं नाव यश असल्याचे सांगितले.खूप भूक लागलीय, आम्ही दोघं उपाशी आहोत, असे ती म्हणू लागली. शोभा यांना तिचा कळवळा आला. पोराकडे बघितलं तर ते पण हसलं. शोभा यांनी टोपलीतील केळी मायलेकरांना खायला दिली. तेव्हा तिने शोभा यांच्याकडे मदत मागितली. ती म्हणाली, मी गुलबर्गाची. मला कोणच नाही. मला जगण्यासाठी मदत कराल का ?. त्यावर शोभा कांबळे यांनी विश्वास ठेवला. त्यांनी कोमलसह यशला घरी आणले. जेवण केले, यशसाठी खेळणी, कपडे आणली. ही माहिती समजल्यावर शेजारी राहत असलेल्या वैशाली कांबळे तेथे आल्या. त्यांना पाहिल्यानंतर यशने माँ म्हणून झेप घेतली. शोभा आणि वैशाली यांनी यशला लळा लावला. यश तक्षशिलानगरमध्ये बागडू लागला. अनेक जण त्याला माया लावू लागले. पण दोन दिवसांनी पहाटे यशला शोभा यांच्या घरात ठेवून कोमल फरार झाली. शोभा यांनीही जास्त वेळ न घालवता पोलिस ठाणे गाठले. त्यावर हवालदार शिवाजी जगताप यांनी घाईत निर्णय न घेता 'कोमल परत येते का ?' हे पाहण्याचा निर्णय घेतला. ही घटना सहायक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांना सांगितली; पण कोमल परत आलीच नाही. यशला मंगळवारी सातारा येथील बाल सुधारगृहात हलविण्यात आले. त्यानंतर म्हसवडच्या बालसंगोपनगृहात रवानगी करण्यात आली.