शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत बदलाचे वारे..

By admin | Updated: August 10, 2014 02:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद आता खारिज करण्यात येणार असून, प्रत्येक महसूल विभागासाठी एक याप्रमाणो प्रभारी नेमण्यात येणार आहेत.

यदु जोशी - मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद आता खारिज करण्यात येणार असून, प्रत्येक महसूल विभागासाठी एक याप्रमाणो प्रभारी नेमण्यात येणार आहेत. पक्षाच्या प्रत्येक आघाडीला (सेल) अध्यक्ष असेल पण सेल आणि पक्ष यांच्यात समन्वयाची जबाबदारी एका पदाधिका:यांकडे दिली जाईल. 
पक्षाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा येत्या दोन दिवसांत होणार आहे. कार्यकारिणीच्या स्वरूपाबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी  ‘लोकमत’ला माहिती दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागू नये म्हणून ठिकठिकाणची नाराजी दूर करण्याची जबाबदारी प्रमुख सहा नेत्यांना देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. 
केसरकर संपर्कात
उद्योगमंत्री नारायण राणो यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकविल्याने आमदार दीपक केसरकर यांना राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आले होते. केसरकर यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असे संकेत तटकरे यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मला ते भेटून गेले. लवकरच त्यांच्याविषयी निर्णय घेऊ, असे तटकरे म्हणाले. 
काँग्रेसने कारवाई केली का?
काँग्रेसच्या विरोधात बंड केलेल्यांना पुन्हा जवळ करण्याचा अर्थ त्यांच्या बंडखोरीला राष्ट्रवादीचे अप्रत्यक्ष समर्थन होते, असा होत नाही का, या प्रश्नात तटकरे म्हणाले की, काँग्रेसने आमच्या उमेदवारांविरुद्ध बंड केलेल्यांवर कारवाईदेखील केली नाही. त्यांच्या उमेदवारांविरुद्ध त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी कारवाया केल्या पण त्यांच्यावरही कारवाई झाली नाही. त्यांचे विजय सावंत, रामप्रसाद बोर्डीकर यांना त्यांनी धक्काही लावला नाही. आम्ही विजयकुमार गावितांना मंत्रिपदावरून हटविले. केसरकरांना कारणो दाखवा नोटीस बजावली. काँग्रेसने काहीच केले नाही, असा टोला तटकरे यांनी हाणला. विदर्भात पाच जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीची भाजपासोबत असलेली अभद्र 
युती तोडण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत अनेकदा 
होऊनही त्याची अंमलबजावणी 
होत नाही, याकडे लक्ष वेधले 
असता तटकरे म्हणाले की, 
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक तातडीने घेण्याविषयीचे पत्र मी उद्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. या बैठकीत सदर मुद्दय़ावर चर्चा करू. 
 
च्राष्ट्रवादीच्या सर्व 62 आमदारांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देणार का, या प्रश्नात तटकरे म्हणाले की, ‘सिटिंग-गेटिंग’ फॉम्यरुला राहील, असे ठरलेले नाही. त्यातील काही जागांवर नवे चेहरे दिले जातील. पक्षाचे काही नेते पक्षाबाहेर आपापल्या संघटना चालवितात. त्याचा पक्षाला फायदा होतो आणि तोटाही. या संघटनांबाबत पक्षाचा धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
च्राष्ट्रवादीतून मोठय़ा प्रमाणात नेते, कार्यकर्ते भाजपा-शिवसेनेत जात असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी ते खरे नाही. काही लोक जात आहेत पण त्यांचा लवकरच भ्रमनिरास होईल. येत्या काही दिवसांत चक्र उलटे फिरेल आणि भाजपा, शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीत येत असल्याचे पाहायला मिळेल, असा दावा तटकरे यांनी केला.