शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलग्रस्त वाहनचालकांना यमाचे दर्शन

By admin | Updated: May 14, 2017 00:39 IST

पोलिसांकडून सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमध्ये ‘सेल्फी विथ यमराज’ या आगळ्या प्रयोगाची शनिवारी फर्ग्युसन महाविद्यालयाजवळील चौकात सुरुवात झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमध्ये ‘सेल्फी विथ यमराज’ या आगळ्या प्रयोगाची शनिवारी फर्ग्युसन महाविद्यालयाजवळील चौकात सुरुवात झाली. मोबाईलवर बोलत धोकादायकपणे वाहन चालविणाऱ्यांना थांबवून वाहतूक पोलिसांनी थेट यमाचे दर्शन घडवून मरणाची जाणीव करून दिली.यम ही मृत्यूदेवता मानली जाते. प्रामुख्याने वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हा नियमभंग करणाऱ्यांना थांबवून यमराजाच्या रुपात असलेल्या कलाकारासोबत सेल्फी काढण्यात आला. दुपारी १२ पर्यंत ही मोहीम सुरू होती. मान आणि कानाच्यादरम्यान मोबाईल धरून बोलणाऱ्या किंवा चारचाकी चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या संबंधितांना यमराजाचे दर्शन घडविण्यात आले. पुन्हा नियमभंग करणार नाही, अशी शपथ घ्यावयास सांगण्यात आले. नियमभंग करणाऱ्यांपैकी काही जणांना आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली. अशोक मोराळे म्हणाले, की सुरक्षित वाहतुकीबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांपैकी सेल्फी विथ यमराज हा उपक्रम होता. मोबाईलवर बोलत गेल्यास वास्तवात यमराजाचे दर्शन होऊ शकते, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न होता.मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. त्या पाशर््वभूमीवर गुडलक हॉटेलजवळील गोपाळकृष्ण गोखले चौकाजवळ सकाळी १० वाजता या विशेष मोहिमेस सुरुवात झाली. वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे, सहायक आयुक्त जयश्री गायकवाड, महेश सरतापे, डेक्कन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते. पहिल्या तासाभरात २० जणांना यमराजासोबत सेल्फी काढायला लावण्यात आले. अप्पा आखाडे यांनी यमराजाची वेशभूषा करून पोलिसांना सहकार्य केले.