शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर

By admin | Updated: March 8, 2017 19:51 IST

शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदी विराजमान झाले असून, हेमांगी वरळीकर यांची उपमहापौरपदी निवड झालीय

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 - मुंबई महापालिकेवर शिवसेनेने पुन्हा भगवा फडकवला आहे. शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदी विराजमान झाले असून, हेमांगी वरळीकर यांची उपमहापौरपदी निवड झालीय. विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे 76व्या महापौर ठरले आहेत. हेमांगी वरळीकर शिवसेनेच्या पहिल्या उपमहापौर ठरल्या आहेत. महाडेश्वर यांच्या बाजूनं शिवसेना 84, भाजपा 83 आणि अपक्ष 4 अशा एकूण 171 नगरसेवकांनी मतदान केलं आहे. अपक्ष उमेदवार मुमताझ खान यांनी सेनेला पाठिंबा दिला नाही. काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना 31 मते मिळाली आहेत.महापौरपदाच्या निवडणुकीच्या मतदानावेळी सपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने हात वर केले नाहीत. मनसेच्या नगरसेवकांनी यावेळी अनुपस्थित राहणं पसंत केलं आहे. पक्षाकडून निरोप न आल्याने नगरसेवक आपापल्या कार्यालयातच बसून होते. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सहभाग घ्यायचा की नाही, याबाबत पक्ष प्रमुखांकडून स्पष्ट सूचना न मिळाल्यानं मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात येणे टाळले. शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर शिवसैनिकांनी ढोल-ताशे वाजवून वाजतगाजत मिरवणुका काढल्या आहेत. त्यामुळे शिवसेना मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वरळी सी-लिंकवरून यांची एक रॅली निघणार आहे. उद्धव ठाकरे या रॅली मुंबईकरांचे आभार मानतील. तसेच हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्त्यांना अभिवादन करणार आहेत.