शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

विसापूरच्या गुप्त दरवाजाने घेतला मोकळा श्वास!

By admin | Updated: May 30, 2016 05:46 IST

. जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ या काळात सलग येणारे सात रविवार त्यांनी या किल्ले संवर्धनासाठी खर्र्च केले आहेत.

अजय महाडिक,

मुंबई- शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील शेकडो गडकोटांची दुरवस्था सुरू असताना सह्याद्रीचे शिलेदार संघाच्या तब्बल ५० शिलेदारांनी मुंबईहून पुण्याला जाताना लोणावळा सोडले की, लागणाऱ्या विसापूरच्या किल्ल्याचे मातीमध्ये गाडले गेलेले दोन प्रवेशद्वार मोकळे केले. विशेष म्हणजे मुंबई, खोपोली आणि पुणे येथील अस्सल चारकमानी असताना स्वत:चे बिझी शेड्युल बाजूला ठेवून त्यांनी किल्ले संवर्धनाची ही मोहीम पार पाडली आहे. या संघामध्ये तीन वर्षांच्या मुलांपासून ६५ वर्षांच्या काकांचाही समावेश आहे. जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ या काळात सलग येणारे सात रविवार त्यांनी या किल्ले संवर्धनासाठी खर्र्च केले आहेत.आतापर्यंत या संघाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर २८ वेळा स्वच्छता मोहीम राबवली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये केलेल्या विसापूरच्या सर्वेक्षणात त्यांना किल्ल्याचे दोन दरवाजे जवळपास आठ ते दहा फूट मातीमध्ये गाडले गेल्याचे आढळून आले. गत शंभर-सव्वाशे वर्षांत ही दुर्गती झाल्याचे अविनाश निंबाळकरे यांनी सांगितले. मग काय, या मंडळीने एकमेकांना संपर्क साधून ‘मिशन विसापूर’ मोहीम आखली. ८ जानेवारी २०१६ चा मुहूर्त ठरला. कुणी माळवली रेल्वे स्थानकावर उतरून तर कुणी आपल्या खासगी वाहनाने भाजे गावात पोहोचले. कारण, येथे आल्याशिवाय लोहगड व त्याच्या पाठी लपलेल्या विसापूरच्या किल्ल्याचे दर्शन होत नाही. लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण करण्यासाठीच या किल्ल्याची निर्मिती केली गेली. सुमित आहेर, अविनाश निंबाळकर, शंकर बुर्डे, रोहिदास झंजाड, कुणाल आमले व सुमित वाणी या अनुभवी शिलेदारांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू झाली. विसापूर किल्ल्याची वाट तशी अरुंद होती. दुपारपर्यंत दरवाजाचा काही भाग मोकळा झाला, तरी पलीकडची बाजू दिसत नव्हती. काम सुरूच होते. संध्याकाळी ६ च्या सुमारास अथक परिश्रमानंतर दरवाजाच्या पलीकडून वाऱ्याची मंद झुळूक आली. दरवाजा दीड फूट उघडला गेला होता. शंकर बुर्डे व स्वप्नील गाडगे यांनी पहार घेऊन पलीकडचा गाळ काढला. दुसऱ्या दिवशी दोन्ही दरवाजांच्या दोन्ही बाजूंना काम सुरू करून जवळपास तीन फूट पायऱ्या मोकळ्या करण्यात आल्या. संध्याकाळपर्यंत दुसरा दरवाजाही एक फूट मोकळा झाला होता. असे करताकरता दोन महिन्यांत सलग सात मोहिमा राबवण्यात आल्या. साधारण दोन महिने प्रत्येक रविवार ‘सह्याद्रीचे शिलेदार संघ, महाराष्ट्र’ने विसापुरात घालवला.शिलेदारांमध्ये गृहिणी व बच्चेकंपनीचा समावेशया मोहिमेमध्ये गौरी आहेर, कीर्ती बुर्डे, नेहा होनकळसे, अर्चना उबाळे, रूपल देसाई, राजश्री पवार व नीलिमा म्हामुणकर या गृहिणींनी प्रत्यक्ष भाग घेतला. तर साई आहेर (५), अंशू बुर्डे (५), शौर्य झंजाड (८), दर्शील देसाई (३) यांनी खारीचा वाट उचलला. खोदकामात सापडली तोफ दुसऱ्या दिवशी खोदकाम सुरू असताना दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला सागर, अविनाश, स्वप्निल व प्रणय खिंड लढवत होते. काम सुरू असतानाच पहार कशावर तरी आदळली आणि खणऽऽ खणऽऽ असा आवाज आला. काय असेल... दुर्गमित्रांच्या मनी प्रश्नांनी गर्दी केली अन् काय, तोफ सापडली. जवळपास पाच फूट गाडली गेलेली तोफ सापडली होती. तोफ तेथेच गुप्त दरवाजात ठेवण्यात अर्थ नव्हता. अर्थात, ती चाळीस फूट वर न्यायची होती आणि वजन होते १ टन (एक हजार किलो). पहार आणि दोराच्या साहाय्याला होती हर हर महादेवची स्लोगन अन् बघताबघता ती वर चढली.