वातावरणातील बदल : इन्फ्लूएन्झा मान्सूननंतर सर्वाधिक घातक नागपूर : मोसमी इन्फ्लूएन्जा (फ्लू)चा संक्रमण काळ हा मान्सून संपल्यानंतर आणि हिवाळा सुरू होताच सुरू होतो. ज्या व्यक्तीमध्ये इन्फ्लूएन्जाचा (संसर्गजन्य रोग) ‘वायरस’ संक्र मित झाला असेल ती व्यक्ती कितीही ठणठणीत असली तरी अजाणतेपणाने सात दिवसापर्यंत आजाराचा प्रसार करीत असते. लहान मुलं यामुळे सर्वाधिक प्रभावित होतात. लहानसहान उपाययांमुळे यातून बचाव केला जाऊ शकतो. हवामानात बदल झाल्याने होणाऱ्या व्हायरल आजारांचे प्रमाण वाढत आहे. मान्सून संपण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे इन्फ्लूएन्जापासून वाचण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्याची गरज आहे, शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव मोहता यांनी एका कार्यक्रमादरम्यान उपरोक्त मार्गदर्शन केले. डॉ. मोहता यांनी सांगितले की, इन्फ्लूएन्जा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. नियमित व सुव्यवस्थित पद्धतीने साबणाने हात स्वच्छ धुतल्यास यापासून स्वत:चे संरक्षण करता येते. एन्फ्लूएन्जाचे व्हॅक्सीन सुद्धा येतात. लहान मुलांमध्ये हे संक्रमण सामान्य बाब आहे. जागतिक स्तरावर ३० टक्के मुलांना हा आजार वर्षातून एकदा तरी होतोच. २०१३ मध्ये देशात एन्फ्लूएन्जा व्हायरसचे घातक आक्रमण झाले होते. यात ५२५० घटना उघडकीस आल्या होत्या. यापैकी ७०० घटना या केवळ महाराष्ट्रातील होत्या. यात संपूर्ण देशात ६९२ लोकांचा मृत्यू झाला होता. डॉ. मोहता यांनी सांगितले की, मान्सून संपण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इन्फ्लूएन्जापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आतापासूनच सज्ज होण्याची वेळ आहे. एच -१ , एन-१ ‘स्वाईन फ्लू ’व्हायरस एन्फ्लूएन्जाचाच एक प्रकार आहे. निमोनियासुद्धा यामुळेच होतो. (प्रतिनिधी)
सात दिवसानंतरही पसरतो व्हायरस
By admin | Updated: September 11, 2014 01:10 IST