शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमधील व्हर्च्युअल क्लासरूम ‘इंटरनेट’शी जोडणार

By admin | Updated: April 28, 2017 02:49 IST

महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये उपग्रह आधारित ‘व्हर्च्युअल क्लासरूम’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनदेखील शिक्षण दिले जात आहे.

मुंबई : महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये उपग्रह आधारित ‘व्हर्च्युअल क्लासरूम’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनदेखील शिक्षण दिले जात आहे. मात्र आता इंटरनेट तंत्रज्ञानातील सुधारणा व इंटरनेटचा वाढलेला वेग लक्षात घेऊन ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ उपग्रहाऐवजी इंटरनेट आधारित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ प्रक्षेपण अधिक वेगवान व तुलनेने अधिक चांगल्या दर्जाचे होणार आहे. विशेष म्हणजे ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ इंटरनेट आधारित केल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना व्याख्याने घरबसल्या पाहणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर येत्या वर्षात २०२ शाळांमध्ये नव्याने सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याने ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ संलग्न असणाऱ्या शाळांची संख्या ६८२ एवढी होणार आहे. ‘व्हर्च्युअल क्लासरूम’साठी वर्ष २०१७ - १८च्या अर्थसंकल्पीय अंदाजात २१ कोटी ८४ लाखांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण खात्याचे उपायुक्त मिलीन सावंत यांनी दिली आहे. उपग्रह तंत्रज्ञानाच्या आधारे ‘व्हर्च्युअल क्लासरूम’करिता प्रक्षेपण करण्याच्या काही मर्यादा आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या आवाजाची व चित्राची गुणवत्ता आणि प्रक्षेपण कालावधीसाठी लागणारा वेळ यांचा समावेश आहे. वर्ष २०११च्या तुलनेत आता इंटरनेट तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणा व इंटरनेटचा वाढलेला वेग लक्षात घेता ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ शिक्षण पद्धती ही उपग्रहाऐवजी इंटरनेट तंत्रज्ञान आधारित करण्याचे महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. उपग्रह तंत्रज्ञानाच्या तुलनेत इंटरनेट आधारित प्रक्षेपणामध्ये आवाज व चित्राची गुणवत्ता अधिक चांगल्या दर्जाची आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष चित्रीकरण व उपग्रहाद्वारे ‘व्हर्च्युअल क्लासरूम’मध्ये दिसणारे प्रक्षेपण; तसेच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर ते चित्रीकरण स्टुडिओपर्यंत उपग्रहामार्फत पोहचणे या प्रक्षेपण प्रवासात अनेकदा काही प्रमाणात कालापव्यय होतो, इंटरनेटमुळे ते टाळता येईल. तसेच तुलनेने अधिक वेगवान व तत्काळ प्रक्षेपण होत असल्याने विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारण्यासाठी तुलनेने अधिक वेळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)