विरार : सोमवारी रात्री घरातून गायब झालेल्या एका १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आज सकाळी तिच्या घराशेजारी आढळून आला. किंजल दीपक शहा (१९) असे तिचे नाव आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिसांनी तिच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.बोळींज नाका येथे राहणारी किंंजल सोमवारी रात्रीपासून गायब झाली होती. दुसऱ्यादिवशी सकाळी तिचा मृतदेह घरापासून जवळच आढळून आला. किंंजलने आत्महत्त्या केली की तिची हत्या झाली याचा पोलीस तपास करीत आहेत. मात्र, प्रेमप्रकरणातून तिची प्रियकराने हत्या केल्याचा संशय असल्याने याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी तिच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)
विरारमध्ये किंजलचा झाला गूढ मृत्यू
By admin | Updated: July 20, 2016 03:47 IST