शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वीरेंद्र तावडेच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: October 27, 2016 00:50 IST

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडीत ८ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडीत ८ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. तावडे याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी पोलिसांच्या विरोधात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर १६ नोव्हेंबरला निर्णय दिला जाईल, असे न्यायाधीश पाटील यांनी स्पष्ट केले. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडे याला पानसरे हत्या प्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीच्या चौकशीमध्ये महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. तावडे सध्या येरवडा कारागृहात आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत बुधवारी संपली. न्यायालयाने त्याच्या कोठडीत चौदा दिवसांची वाढ केली. दरम्यान, डॉ. तावडे ‘एसआयटी’च्या ताब्यात असताना अ‍ॅड. समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांना त्याची भेट घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती; परंतु पोलिसांनी या दोघांनाही भेट नाकारल्याने त्यांनी त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश पाटील यांनी १६ नोव्हेंबरला निकाल दिला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)