शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वीरेंद्र तावडेच सूत्रधार

By admin | Updated: September 8, 2016 06:25 IST

हिंदू जनजागृती समितीचा सदस्य आणि सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार असून

पुणे : हिंदू जनजागृती समितीचा सदस्य आणि सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार असून त्यानेच विनय पवार, सारंग अकोलकर व इतरांच्या मदतीने दाभोलकरांची हत्या केल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुणे येथील न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे़ सीबीआयचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस़ आऱ सिंह यांनी बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही़ बी़ गुळवे-पाटील यांच्या न्यायालयात वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले़ तावडेवर भारतीय दंड विधानच्या कलम १२० (ब) (गुन्हेगारी कट) व ३०२ (खून) तसेच इतर आरोप ठेवण्यात आले आहेत, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. २० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची बालगंधर्व रंगमंदिराजवळ शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र, वर्षभरानंतरही दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा तपास लागत नसल्यामुळे राज्यात मोर्चे, निदर्शनांचे सत्र सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर आले आहेत, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. २० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची बालगंधर्व रंगमंदिराजवळ शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र, वर्षभरानंतरही दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा तपास लागत नसल्यामुळे राज्यात मोर्चे, निदर्शनांचे सत्र सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने मे २०१४ मध्ये दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. सीबीआयने गेल्या जून महिन्यात तावडेला अटक केली होती. दाभोलकर यांच्या हत्येत तावडेसह सारंग अकोलकर याचाही हात असल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे. २००९ च्या गोवा बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विनंतीवरून इंटरपोलने जुलै २०१२ मध्ये अकोलकरविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. अकोलकरही सनातन संस्थेचा कथित कार्यकर्ता आहे. सीबीआयने १ जून रोजी तावडे याच्या पनवेल येथील घरी तसेच सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकला होता़ तसेच अकोलकर याच्या पुण्यातील घरावरही छापा टाकला होता़ त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीवरुन सीबीआयने १० जून २०१६ ला तावडे याला अटक केली होती़ तो सध्या कॉ़ गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे़ (प्रतिनिधी)तपासात पुढे काय?1दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी वापरण्यात आलेल्या रिव्हॉल्व्हरचा बॅलेस्टिक अहवाल परदेशातून मागविला असून तो आल्यानंतर या गुन्ह्याचे आणखी धागेदोरे उकलण्याची शक्यता आहे़ 2फरार आरोपी व तावडे याच्या मोटारसायकलीचा तपास देखील करायचा आहे. डॉ.दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांना अटक केली होती़ ते सध्या जामिनावर आहेत, असे आरोपपत्रात म्हटले आहे़ काय म्हटले आहे २४ पानी आरोपपत्राततपासात निष्पन्न बाबींचा गोषवारा.कट रचणे आणि हत्या करणे असे आरोप वीरेंद्र तावडेवर ठेवले. डॉ़ दाभोलकर हे रुढी, परंपरा यांच्याविरुद्ध मोहीम चालवितात़ अंधश्रद्धा निर्मुलनाविषयी बोलतात़ संत, देवाबद्दल अनुचित उद्गार काढतात़, चमत्काराला आव्हान देतात म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली. दाभोलकर यांची हत्या झाली त्यावेळी त्या परिसरात साफसफाईचे काम करणारे ६ साक्षीदार तपासात निष्पन्न झाले असून त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला होता. काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन दोघे जण जाताना पाहिले होते.वीरेंद्रसिंह तावडे याने मुंबईतून एमबीबीएस केले. २००१ पर्यंत कोल्हापूर येथे तो प्रॅक्टिस करीत होता़ सनातन संस्थेचे प्रमुख डॉ़ जयंत आठवले यांच्या भाषणाने प्रभावीत होऊन १९९८ मध्ये तो सनातनच्या संपर्कात आला़ कोल्हापूरात त्याने भाषणे देणे सुरु केले. 2003ला तो सनातनचा समन्वयक म्हणून काम पाहू लागला़ हिंदू जनजागृती समितीशी त्याचा संपर्क झाला़ अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाबाबत डॉ़ दाभोलकरांची कोल्हापूरची बैठक त्याने इतरांच्या मदतीने उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता़ शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्याविरोधात २००४ मध्ये कॉ़ पानसरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात मोर्चा निघाला होता़ त्याला विरोध करण्यास तावडने मोर्चा काढला होता़ नवरात्रीच्या दरम्यान कोल्हापूर ख्रिश्चन फादर विजय फिली यांनी हिंदू महिलेचे धर्मपरिवर्तन केले होते़ या महिलेला पंचगंगेवर नेऊन तिला प्रार्थना करायला सांगितली होती़ तावडेने तेथे जाऊन विरोध केला होता़ २००६ पर्यंत तावडे हा वेगवेगळ्या मार्गाने कारवाई करीत होता़ आरोपपत्रात विनय पवार, सारंग अकोलकर या दोघांवर सबळ पुराव्यांसह आरोप ठेवले आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने अटक होण्याची आवश्यकता आहे.