शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात विराट क्रांती मोर्चा

By admin | Updated: September 29, 2016 01:39 IST

कोपर्डीतील घटनेचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या क्रांती मोर्चात बुधवारी पांझरा नदीतीरी एकजुटीचे विराट दर्शन घडले.

धुळे : कोपर्डीतील घटनेचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या क्रांती मोर्चात बुधवारी पांझरा नदीतीरी एकजुटीचे विराट दर्शन घडले. धुळे जिल्ह्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने एकवटलेला जनसागर प्रथमच पाहायला मिळाला.मोर्चाच्या अग्रस्थानी असलेल्या तरुणींनी सुरुवातीला पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. १३ तरुणींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चात ऐतिहासिक मराठा क्रांतीचे दर्शन घडले. दुपारी २ वाजता शिवतीर्थाजवळ मोर्चाचा समारोप झाला़ आयोजकांनी पार्किंगचे योग्य नियोजन केल्यामुळे वाहतुकीचीकोंडी टळली. मोर्चाचे पहिले टोक व्यासपीठाजवळ आले, तेव्हा शेवटचे टोक हे नगावबारीपर्यंत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर तरुणींनी कोपर्डी घटनेचे भीषण वास्तव संवेदनशीलतेने मांडले़ गुजरातमधील सुरत येथील सकल मराठा समाजातर्फे मोर्चेकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. बटाट्याची भाजी व पुरी असे एका पाकिटात मोर्चेकऱ्यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)१०६ वर्षांच्या आजी सहभागीमोर्चात १०६ वर्षांच्या सुशिलाबाई भीमसेनराव पाटील या त्यांचे १०० वर्षांचे भाऊ माधव पाटील यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या. त्यांची उपस्थिती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.४५० मोर्चेकऱ्यांना उन्हाचा त्रासमोर्चात सहभागी झालेल्या सुमारे ४५० जणांना बुधवारी कडक उन्हाचा त्रास झाला. त्यात महिलांचा समावेश अधिक होता. ४०० जणांवर जिल्हा रुग्णालयातील मारवाडी युवा मंचच्या वैद्यकीय सेवा स्टॉलवर प्राथमिक उपचार करण्यात आले़ तर सुमारे ५५ मोर्चेकऱ्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले़ प्रथमोपचार करून त्यांना सोडण्यात आले. उन्हामुळे काहींना मळमळ, उलटी, गरगरणे आदी त्रास झाला. उन्हापासून संरक्षणासाठी अनेकांनी डोक्याला रुमाल बांधला होता, काहींनी टोपी घातली होती़