शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

विराट कोहलीची आॅडी स्वत:साठीच

By admin | Updated: April 10, 2017 03:36 IST

प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून ५० लाखांमध्ये खरेदी केलेली आॅडी आर ८ ही कार मैत्रिणीसाठी नव्हे

जितेंद्र कालेकर / ठाणे प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून ५० लाखांमध्ये खरेदी केलेली आॅडी आर ८ ही कार मैत्रिणीसाठी नव्हे, तर स्वत:साठीच घेतली होती, असा दावा ठाण्याच्या कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याने पोलिसांकडे केला आहे. कॉल सेंटरमधून करोडो रुपये कमवले असले, तरी भागीदार आणि इतरांनी ते वाटून घेतल्यामुळे आपल्या वाट्याला अगदी तुटपुंजी रक्कम आल्याचेही त्याने चौकशीत सांगितले.गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना गुंगारा देणाऱ्या शॅगीला शनिवारी पहाटेच्या सुमारास ठाणे पोलिसांनी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. सुरुवातीला सराईत गुन्हेगाराप्रमाणे आपण त्या गावचेच नसल्याचा आव आणणाऱ्या शॅगीने आता थोडीथोडी माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सहावीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या बोरीवलीत, सातवी ते दहावी नालासोपाऱ्यात शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण मात्र अहमदाबाद येथे झाले. तिथेच रसायनशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या शॅगीला तंत्रज्ञानात मोठी आवड असल्यामुळे अहमदाबादमध्येच एका कॉल सेंटरमध्ये तो नोकरीला लागला. कॉल सेंटरमधील नोकरीतच अमेरिकन नागरिकांना गंडा कसा घातला जातो, याचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षणही त्याला मिळाले. यातूनच आपणही असाच ‘उद्योग’ सुरू करण्याची शक्कल त्याला सुचली. पुढे ठाण्याच्या मीरा रोड आणि काशिमीरा येथे काही मित्रांच्या मदतीने त्याने कॉल सेंटरचा डोलारा उभा केला. अमेरिकन नागरिकांना गंडा घातल्यानंतर १०० रुपयांपैकी त्यातील ६० रुपये हवालामार्फत मिळायचे. मग, कॉल सेंटरमधील १५० ते २०० कर्मचाऱ्यांचे पगार, वेगवेगळे भागीदार असल्यामुळे १० ते १५ कोटींची रक्कम मिळवूनही त्यातून तुटपुंजी रक्कम वाट्याला आल्याचा दावा आता शॅगीने केला आहे. मार्केटमध्ये नवनवीन गाड्या आल्यानंतर त्या खरेदीची आवड असल्यानेच एका दलालामार्फत भारतीय क्रिकेट संघातील कर्णधार विराट कोहली याची अडीच कोटींची कार अवघ्या ५० लाखांमध्ये मिळाल्याने तीची खरेदी केली. मात्र, ती मैत्रिणीसाठी नव्हे तर स्वत:साठी खरेदी केली होती, असाही त्याने दावा केला आहे. त्याची ही आॅडी पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथून जप्त केली. या प्रकरणात शॅगी हा महत्त्वाचा आरोपी असल्यामुळे आणखी बरीच माहिती त्याच्याकडून मिळण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. तुटपुंजी रक्कम वाट्याला आलीअमेरिकन नागरिकांना गंडा घातल्यानंतर १०० रुपयांपैकी त्यातील ६० रुपये हवालामार्फत मिळायचे. मग, कॉल सेंटरमधील १५० ते २०० कर्मचाऱ्यांचे पगार, वेगवेगळे भागीदार असल्यामुळे १० ते १५ कोटींची रक्कम मिळवूनही त्यातून तुटपुंजी रक्कम वाट्याला आल्याचा दावा आता शॅगीने केला आहे.