मडगाव : वीज अभियंता मारहाण प्रकरणी शिक्षा भोगत असलेले माजी मंत्री मिकी पाशेको यांना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याच्या तक्रारीची न्यायालयाने गंभीरदखल घेतली आहे. दक्षिण प्रधानसत्र जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी तुरुंग महानिरीक्षक एल्वीस गोम्स यांना पाशेको यांच्या व्हीआयपी ट्रीटमेंटबाबत कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.पाशेको हे तुरुंगातून मोबाइलवर अनेकांशी संपर्क साधत आहेत. तसेच त्यांना अनेक जण भेटतात, अशा आशयाची तक्र ार सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी न्यायालयाकडे केली होती. पाशेको ज्या मोबाइल क्रमांकावर दुसऱ्याशी संपर्क साधतात त्याचा क्रमांकही तक्रारदाराने तक्रारीत नमूद केला होता. हा क्रमांक पाशेको यांच्या मालकीच्या फ्रान्सा ट्रॅव्हलर्स या कंपनीच्या नावे आहे. पाशेको यांना मिळत असलेली ही वागणूक बघता त्याची रवानगी कोलवाळच्या तुरुंगात करावी, अशी मागणीही याचिकादाराने केली होती. (प्रतिनिधी)
पाशेको यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट
By admin | Updated: September 21, 2015 00:46 IST