शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर माळींना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’!

By admin | Updated: June 11, 2014 01:41 IST

मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गंभीर असलेल्या गरीब रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था असते. केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न अनेक

सुमेध वाघमारे - नागपूर मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गंभीर असलेल्या गरीब रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था असते. केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न अनेक वेळा पडतो. मात्र त्याचवेळी धडधाकट असलेल्या आरोपींना वातानुकूलित अतिदक्षता विभागात ठेवून अगदी ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जाते. हा धक्कादायक प्रकार आज उजेडात आला. लाच घेताना अटक केलेल्या अरुण माळी यांच्यावर विशेष उपचार सोमवारच्या रात्रीपासून सुरू आहे. औषध वैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागाचा अंतर्गत वॉर्ड क्र. २४ हा अतिदक्षता विभाग येतो. २४ खाटांच्या या विभागात सुमारे १८ रुग्णांना सामान्य विभागात ठेवले जाते तर विशेष सहा रुग्णांना वातानुकूलित विभागात ठेवले जाते. अतिदक्षता विभागात सर्जरी व इतरही विभागाच्या गंभीर रुग्णांनाही ठेवले जाते. यामुळे मेडिकलमधील हा विभाग सर्वात व्यस्त आहे. अनेक वेळा या विभागात गंभीर रुग्णांनाही खाट मिळत नाही.माळी आजारी आहेत ?सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांना रविवारी अडीच लाख रु पयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने अटक केली. सोमवारी त्याला पोलीस कोठडी मिळाली. रात्री ११.३० वाजता छातीत दुखते आणि घबराहट होते म्हणून त्याला याच विभागात आणले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रात्रीच एका हृदयतज्ज्ञ डॉक्टरांनी त्याला तपासले. ईसीजी काढला. परंतु त्यात हृदयाशी संबंधित बदल दिसले नाही. तसा अहवालही दिला. सामान्यत: त्याचवेळी लगेच औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या संबंधित डॉक्टरने त्याला पोलिसांच्या हवाली किंवा सामान्य वॉर्डात हलवायला हवे होते. परंतु त्याला वातानुकूलित असलेल्या अतिदक्षता विभागातच ठवले. आज सकाळपासून माळी आपल्या मोबाईलमध्ये गाणी ऐकत होते, गेम खेळत होते, मोबाईलवरून दुसऱ्याशी संवाद साधत होता. याची कोणीच दखलही घेतली नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे त्याला ना सलाईन लावलेले होते ना इतर कुठले औषध. तरीही आज सकाळपासून त्याला काय पाहिजे-नको त्याची गंभीरपणे खबरबात घेणे सुरू होते. मात्र त्याचवेळी भरती असलेल्या इतर रुग्णांकडे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येत होते. त्या सामान्य रुग्णांना विविध मशीन लावून आपली जबाबदारी संपली असे वागताना काही डॉक्टर दिसून येत होते. त्यांची शुश्रुषा करण्यासाठी त्यांचे नातेवाईकच धावपळ करीत होते. ही माणुसकीची शोकांतिका आहे, असे येथील रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)