शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
2
किश्तवाडमध्ये ३-४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले; चकमक सुरु, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादांचा शोध सुरु...
3
१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 
4
प्लेऑफ्सची लढाई जिंकली! पण Qualifier 1 च्या शर्यतीत MI स्वबळावर टिकणं मुश्किल, कारण...
5
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
6
उत्तर कोरियाची नवीकोरी युद्धनौका पाण्यात जाताना कोसळली; किम जोंग उन भडकले, सैन्यालाच कारवाईची धमकी दिली
7
"असं वाटलं मृत्यू समोर आलाय", इंडिगो विमानात अडकलेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांनी सांगितली आपबिती
8
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
9
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
10
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
11
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
12
VIDEO : तुफान गारपिटीत सापडले विमान, वैमानिकाने सुखरूप उतरवले; प्रवाशांत प्रचंड घबराट; करु लागले देवाचा धावा
13
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
14
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
15
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
16
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
17
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
18
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
19
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
20
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

विधान परिषद सभागृह नेतेपदी विनोद तावडे?

By admin | Updated: June 10, 2016 05:06 IST

विधान परिषद सभागृह नेतेपदी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना नियुक्त करण्यास पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिल्याचे समजते.

अतुल कुलकर्णी,

मुंबई- एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याने रिकाम्या झालेल्या विधान परिषद सभागृह नेतेपदी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना नियुक्त करण्यास पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिल्याचे समजते. एका ज्येष्ठ मंत्र्याने या माहितीस दुजोरा दिला.विधान परिषदेत नव्याने आलेल्या १० सदस्यांमुळे अनेक राजकीय गणिते बदलली आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या दुहेरी हल्लयाला तोंड देण्यासाठी मराठा समाजाचा नेता सभागृहात असावा असे समीकरण पुढे आल्याने तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. तावडेंना हे पद देऊ केल्यास पक्षाच्या दृष्टीने काही फायदे असल्याचेही सांगितले जाते. तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे खडसे प्रकरणानंतर नाराज होते. मुंडे यांनी स्वतंत्र पोस्टर्स लावली होती. हे सगळे पहाता परिषदेच्या नेतेपदाची जबाबदारी तावडेंवर टाकण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. पावसाळी अधिवेशन १८ जुलै पासून सुरु होणार आहे. त्यावेळी ही घोषणा केली जाईल. तावडे हे पद घेण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. मध्यंतरी अग्नीरोधक यंत्रे खरेदी करण्याचे प्रकरण गाजले होते. त्या पार्श्वभूमीवर देखील तावडेंकडे नेतेपद देण्याच्या कृतीचे पक्षात वेगळे समर्थन केले जात आहे. दरम्यान, राणे यांनी खडसेंच्या राजीनाम्यावर राजकीय मुत्सदीगिरी दाखवत प्रतिक्रीया दिली. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचे खंडन केले. हे पहाता काँग्रेसमधील संघर्षही नजीकच्या काळात पहायला मिळेल असे सांगितले जाते. माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. अशोक चव्हाण या सगळ्यांना राणे एका ठराविक चौकटीत रहावेत असे वाटते. त्यातूनच त्यांना उपसभापती पदाचे उमेदवार करण्याचे घाटले जात आहे. पण राणे हे पद घेऊन कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला चौकटीत अडकवून घेणार नाहीत. एकूणच भाजपा आणि काँग्रेस यांच्यात विधानपरिषदेतील दोन पदांवरुन येत्या काळात राजकारण पहायला मिळेल हे नक्की.पावसाळी अधिवेशनात घोषणेची शक्यतापावसाळी अधिवेशनात ही घोषणा केली जाईल. तावडे हे पद घेण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. मध्यंतरी अग्नीरोधक यंत्रे खरेदी करण्याचे प्रकरण गाजले होते. त्या पार्श्वभूमीवर देखील तावडेंकडे नेतेपद देण्याच्या कृतीचे पक्षात वेगळे समर्थन केले जात आहे.