शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ढगाळ वातारवण!

By admin | Updated: November 25, 2015 01:56 IST

तूर, हरभरा पिकाला बाधक; किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता.

अकोला : मध्यपूर्व अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात प्रदेशाच्या भागावर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने मागील चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, तर कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे असले तरी विदर्भात वातावरण ढगाळ आहे. हे वातावरण तूर, हरभरा पिकांना बाधक ठरणारे असल्याने या पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व र्तविण्यात येत आहे. वातावरणातील या बदलामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, तर कोकण-गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान ता पमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नांदेड येथे १६.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, विदर्भावर असलेले ढगाळ वातावरण पिकांना बाधक ठरण्याची शक्यता आहे. यावर्षी पावसाअभावी खरीप पिकांना जबर फटका बसला असून, रब्बी पिकांचे क्षेत्र अर्धेच आहे; पण तूर या वातावरणातही तग धरू न आहे. तुरीच्या पिवळ्य़ा फुलांनी शिवार बहरले असून, अनेक ठिकाणी शेंगा आल्या आहेत. या पिकावरच आता शेतकर्‍यांचा भरवसा आहे; पण शेंगा भरण्याच्या वेळीच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अगोदरच या पिकावरील किडींचे व्यवस्थापन करताना शेतकरी हैराण आहे. त्यात ढगाळ वातावण रोग, किडींना पोषक असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. ढगाळ वातावरण असेच चार-पाच दिवस राहिल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढण्यात मदत होणार असल्याने शेतकर्‍यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढणार आहे. का पसावर येत असलेली हिरवी बोंडअळी हरभर्‍यावर येण्याची शक्यता असल्याने या पिकावरचा खर्च वाढणार आहे. ढगाळ वातावरण असेच चार-पाच दिवस राहिल्यास तूर व हरभरा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी दररोज शेताचं सर्वेक्षण करण्याची गरज असून, तुरीवर आलेली शेंगा पोखरणारी अळी व हरभर्‍यावरील किडींचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशींनुसार कीडनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी.बी. उंदीरवाडे यांनी दिला.