शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

‘विंदा जीवनगौरव’ हा तर विनोदाचा सन्मान!

By admin | Updated: February 28, 2015 04:47 IST

ग्रामीण व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. ग्रामीण माणसाचा इरसालपणा लिहिला आणि तो कथाकथनातून सांगितला.

मुंबई : ग्रामीण व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. ग्रामीण माणसाचा इरसालपणा लिहिला आणि तो कथाकथनातून सांगितला. मराठी भाषा दिनी विंदा करंदीकरांसारख्या सहृदय कवीच्या नावाने होणारा सन्मान म्हणजे त्या विनोदाचा सन्मान आहे, अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी व्यक्त केली. मराठी भाषा विभाग आणि राज्य संस्कृती मंडळाच्या वतीने २०१३ सालच्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण आज प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात झाले. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते मिरासदार यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी मिरासदार म्हणाले की, विंदा यांना मी केवळ एक कवी म्हणून नव्हे, तर चांगला मनुष्य म्हणून ओळखतो. त्यांचाशी व्यक्तिश: स्नेह होता. मराठी भाषा दिनी त्यांच्या नावाचा सन्मान मिळाला याचा आनंद जास्त आहे, अशी भावना मिरासदारांनी व्यक्त केली. तर, रामदास भटकळ यांच्या हस्ते केशव भिकाजी ढवळे प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्काराने सन्मानित् ा करण्यात आले. ढवळे प्रकाशनचे अंजनेय ढवळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ११४ वर्षे वाचकांची सेवा केल्याचा सन्मान आहे, असे अंजनेय ढवळे म्हणाले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे व्यासपीठावर उपस्थित होते.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास थोडा विलंब झाला आहे. मराठी भाषा दिनी तो जाहीर होण्याची अपेक्षा होती. परंतु येत्या २०-२५ दिवसांत तशी घोषणा नक्की होईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले. (प्रतिनिधी)