शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विनायक निम्हण यांची ‘घरवापसी’

By admin | Updated: January 29, 2015 03:34 IST

काँग्रेस नेते नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक व माजी आमदार विनायक निम्हण तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत आले

पुणे : काँग्रेस नेते नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक व माजी आमदार विनायक निम्हण तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत आले. पक्षाने त्यांची तातडीने शहरप्रमुखपदी नियुक्तीही केली.विधानसभा निवडणुकीच्या काळात निम्हण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, भाजपाच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला होता. त्यानंतर निम्हण यांनी काँग्रेसकडून शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढविली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पुणे शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठीही ते इच्छुक होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत २६ जानेवारीला झालेल्या स्नेह मेळाव्यातही त्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, बुधवारी त्यांनी मुंबईत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. १९९९ व २००४ असे दोन वेळा ते शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून आले होते. राणे यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांनी त्यांच्यासोबतच २००५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००९ मध्ये ते पुन्हा विधानसभा निवडणूक जिंकले. त्यांना काँग्रेसमधून राज्यमंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने ते राणे यांच्यापासून दूर गेले. त्यानंतर ते पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. चव्हाण यांच्या आग्रहामुळेच त्यांनी निवडणूक लढविली. शहरप्रमुख म्हणून २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भगवा फडकविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया निम्हण यांनी दिली.