शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विनायक मेटेंचा शिवसेनेशी घरोबा!

By admin | Updated: January 9, 2017 05:08 IST

भाजपाकडून वारंवार डावलले जात असल्याने नाराज असणारे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : भाजपाकडून वारंवार डावलले जात असल्याने नाराज असणारे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही सदिच्छा भेट होती,असा खुलासा मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आगामी काळात राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि ११ महापालिकांसाठी राजकीय दंगल रंगणार आहे. भाजपाने आक्रमकपणे राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली आहेत. मित्रपक्ष शिवसेनेसह घटकपक्षांना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना या पक्षांकडून वारंवार व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मेटे यांनी मातोश्री गाठल्याने तर्कवितर्क लढविण्यात आले. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष असतानाही आपणास भूमिपूजन समारंभात सन्मानाची वागणूक मिळाली नाही, अशी नाराजी मेटे यांनी व्यक्त केली होती. मातोश्रीच्या भेटीसंदर्भात मेटे म्हणाले की, शिवसेना व भाजपाने सोबत निवडणुका लढवाव्यात आणि आम्हालाही सोबत घ्यावे, अशी आम्हा सर्व घटकपक्षांची भावना आहे. मात्र आम्हाला सोबत घेतले नाही, तर जिथे कुठे शक्य असेल तिथे आम्हाला निवडणुका लढवाव्याच लागतील. आगामी निवडणुकांमध्ये जिथे आमची ताकद आहे, तिथे जागा द्या, अन्यथा आम्हालाही वेगळा पर्याय निवडावा लागेल, असा प्रस्ताव भाजपाला आम्ही दिला आहे. किमान महाराष्ट्रातील जे विषय आहेत त्याबाबत मित्रपक्षांना विश्वासात घेऊन सन्मानाची वागणूक भाजपाने दिली पाहिजे. भाजपा कसा मानसन्मान ठेवतो, हे महाराष्ट्राला माहित आहे, असा टोलाही मेटे यांनी लगावला. (प्रतिनिधी)