शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ साहित्यिक विनायक गजानन उर्फ वि.ग कानिटकर यांचं निधन

By admin | Updated: August 30, 2016 15:42 IST

ज्येष्ठ साहित्यिक विनायक गजानन उर्फ वि.ग कानिटकर यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - ज्येष्ठ साहित्यिक विनायक गजानन उर्फ वि.ग कानिटकर यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी ते घरात पडले होते, त्यामुळे उपचारासाठी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत माजवली. त्यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी सदाशिव पेठेतील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, दिलीप माजगावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेतले. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
 
इस्त्रायल-युद्ध, युद्ध आणि युद्धच, ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘विन्स्टन चर्चिल’, ‘महाभारताचा इतिहास’, ‘होरपळ’ ही कानिटकर यांची पुस्तके साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहेत. वि.ग कानिटकर यांचा जन्म मालाड, मुंबई येथे 26 जानेवारी 1926 रोजी झाला. बी.एसस्सी आणि बी.ए (ऑनर्स) अशा दोन पदव्या त्यांनी संपादन केल्या. केंद्र सरकारच्या अकाऊंटंट जनरलच्या कचेरीत 37 वर्षे त्यांनी नोकरी केल्यानंतर लेखनामध्ये ते अधिककाळ रमले. इतिहास व चरित्रे याविषयावर त्यांनी विपुल लेखन केले.
 
यामध्ये ‘माओ क्रांतीचे’, व्हिएतनाम’, ‘अँडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी’, ‘हिटलरचे महायुद्ध’, ‘अब्राहम लिंकन; फाळणी टाळणारा महापुरूष’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘फाळणी: युगांतापूर्वीचा काळोख’ या पुस्तकाला साहित्यसम्राट न.चिं केळकर पारितोषिकही मिळाले आहे. दर्शन ज्ञानेश्वरी गाजलेल्या प्रस्तावना या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. फ्रँक वॉरेल आणि रोहन कन्हाय अशी मुलांसाठी त्यांनी चरित्रेही लिहिली. ‘खोला धावे पाणी’, शहरचे दिवे’ यांसारख्या कादंब-या तसेच मनातले चांदणे’, ‘आसमंत’, ‘सुखाची लिपी’, ‘लाटा’, आणखी पूर्वज’, ‘जोगवा’ हे त्यांचे काही गाजलेले कथासंग्रह आहेत. ‘पूर्वज’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. अनुवादाच्या क्षेत्रातही त्यांनी मौलिक लेखन कार्य केले. ‘संस्कार’, ‘वय नव्हतं सोळा’, ‘एक रात्रीची पाहुणी’, ‘अकथित कहाणी’ आणि अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न’ ही त्यांची गाजलेली अनुवादित पुस्तके आहेत.