शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विनय पवार, सारंग अकोळकर फरार घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:03 IST

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात संशयित फरार सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर

- लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात संशयित फरार सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) या दोघांना सत्र न्यायालयाने शनिवारी फरार घोषित केले. दरम्यान, समीर गायकवाड याला न्यायालयीन कामकाजासाठी मुंबईला जाण्यासाठी मंजुरी देण्यात आली.पानसरे हत्येप्रकरणी शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सुनावणी झाली. पवार व अकोळकर यांना अजामीनपात्र वॉरंट लागू केले आहे. ते पोलिसांपासून अस्तित्व लपवित आहेत. अटक टाळण्यासाठी ते फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. या दोघांना फरार घोषित करावे अशी लेखी विनंती सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी केली. ती न्यायाधीश बिले यांनी मान्य केली. हे दोघे पोलिसांत हजर न झाल्यास त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात यावी, अशीही विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आली. त्यानंतर समीर गायकवाड हा जामिनावर बाहेर आहे. त्याचा जामीन रद्द करावा, यासाठी पोलिसांनी याचिका दाखल केली आहे. त्यासंबंधी तो १४ ते २६ आॅगस्टपर्यंत मुंबईला जाणार आहे. या कालावधीत येणाºया रविवारी (दि. २०) तो दादर पोलीस ठाण्यात हजेरी देईल, अशी विनंती अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी केली. त्यावर अ‍ॅड. राणे यांनी दादर पोलीस ठाण्यातील हजेरी रेकॉर्ड व मुंबईत तो कुठे राहणार याची संपूर्ण माहिती न्यायालयास सादर करावी, अशी मागणी केली. न्यायाधीश बिले यांनी समीरला मुंबईला जाण्यास मंजुरी दिली.पवार व अकोळकर (कुलकर्णी) यांचा कोल्हापूर गुन्ह्यातील पिस्तूल व मोटारसायकल गायब करण्यामागे हात आहे. पानसरे यांच्या हत्येमध्ये या दोघांसह समीर गायकवाड व डॉ. वीरेंद्र तावडे यांचा मुख्य सहभाग आहे.