शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

खलनायकी भूमिका अधिक भावखाऊ!

By admin | Updated: June 8, 2014 00:58 IST

बालाजी फिल्म्सची निर्मिती ‘एक व्हिलन’ सिनेमातील मुख्य कलाकार सिद्धार्थ मल्होत्ना व नायिका श्रद्धा कपूर यांनी लोकमत कार्यालयास नुकतीच भेट दिली.

सिद्धार्थ मल्होत्र : ‘एक व्हिलन’ कलाकारांची लोकमत कार्यालयास भेट 
बालाजी फिल्म्सची निर्मिती ‘एक व्हिलन’ सिनेमातील मुख्य कलाकार  सिद्धार्थ मल्होत्ना व नायिका श्रद्धा कपूर यांनी लोकमत कार्यालयास नुकतीच भेट दिली. मोहित सुरीचं दिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमाविषयी अधिक जाणून घेता तर आलंच, पण सिद्धार्थ आणि श्रद्धा यांचे अंतरंगही जाणून घेता आले.
 टीपिकल हिंदी सिनेमातील नायकाचं वर्णन करता येईल, असा सिद्धार्थ आणि मधूनच मराठी बोलून आपलेपणा निर्माण करणारी श्रद्धा कपूर यांनी आपापली मनोगतं व्यक्त केली. सिद्धार्थने म्हणाला, एक व्हिलनमध्ये नेमके व्हिलन -(खलनायक) कोण, असा प्रश्न पडावा, अशी रहस्यमय, पण तरीही सतत उत्कंठावर्धक असे कथानक आहे. रितेश देशमुख, श्रद्धा आणि  सिद्धार्थ हे त्रिकुट ग्रे शेडमध्ये असले, तरी खलनायकदेखील प्रेमात पडतात. त्यांची प्रेमकहाणी किती-कशी वेगळी असू शकते, माणसाच्या अंतरंगातील द्वंद्व कधी खलनायकी ठरू शकतं, असं सगळं या सिनेमात आहे. तर,  शाहरूख खान माझा आदर्श असल्याचं त्यानं आवजरून सांगितलं़ 
‘हमारी इस फिल्म में कोई हिरो नही, सब व्हिलन है!’ सिद्धार्थला पुष्टी देत श्रद्धाने खळखळून हसत म्हटलं, प्रेमाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो, आम्ही मात्न येत्या 27 जून रोजी  खलनायकांची कथा सांगण्यासाठी  व्हिलनटाइन डे साजरा करू.  
 अभिनेता शक्ती कपूरची लेक आणि पद्मिनी कोल्हापुरेची भाची असलेली श्रद्धा कपूरला फेसबुकवर पाहून तिला पहिला ‘तीन पत्ती’ चित्नपट मिळाला; पण त्या सिनेमाला अपयश मिळालं आणि श्रद्धा लॅक्मेची ब्रँड अॅम्बॅसिडर बनली. 
आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरेंकडे कधी तानपुरा घेऊन बसली. त्यानंतर तिला आशिकी -2 सिनेमा मिळाला  आणि त्याच्या यशाने तिच्याकडे एक सफल अभिनेत्नी म्हणून पाहिले जाऊ लागले. मी माङया वडिलांकडून कधीही अपेक्षा व्यक्त केली नाही, कारण आपल्या मुलांना लाँच करणं एक वेळ सोपं असतं, पण यश टिकवणं कठीण! माङया वडिलांनी शून्यातून सुरु वात केली, खूप कठीण दिवस काढलेत. मला तर त्यांची लोकप्रियता, त्यांचे नाव आयतं लाभलंय! श्रद्धाला  गोड गळ्याची देणगी मिळालीय. संधी मिळेल तेव्हा मी गाणं गाईन, असं श्रद्धा म्हणते. लोकमत कार्यालयात तिने गलिया हे तिनेच गायलेले लोकप्रिय ठरलेले गीत गाऊन दाखवले!
- पूजा सामंत
 
4माङया वडिलांनी शून्यातून विश्व निर्माण केले : श्रद्धा कपूर 
 
संघर्षाची वाट मधुर
4बॉलिवूडमध्ये बहुतेक स्टार्स हे आपल्या फिल्मी नात्यांची वहिवाट घेऊन आलेले आहेत . मशहूर  कपूर खानदानातील करीना-रणबीर या स्टार्सना संधी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही, हे सर्वश्रुत आहे. पण, कुठलीही फिल्मी पाश्र्वभूमी नसताना सिद्धार्थला करण जोहरसारख्या नामांकित बॅनरमध्ये सुसंधी मिळाली कशी?  सिद्धार्थ ऊर्फ सिड सांगतो, माङो इथे कसलेही लागेबांधे नाहीत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्ना माझा मामा लागतो, ही देखील अफवाच! 
4बॉलिवूडमध्ये मोठय़ा संख्येने असलेले मल्होत्ना हे फक्त आडनाव बंधू ! मी पॉकेटमनी मिळतो, आवडते म्हणून मॉडेलिंग सुरू केले, पण मनसुबा मात्न अभिनयाचा होता. मुंबई गाठली. अभिनय आणि निर्मिती यांतील बारकावे शिकण्याची संधी घ्यावी म्हणून सहायक दिग्दर्शकाची संधी घेतली, तीही करण जोहरकडे मिळाली.
4दोन वर्षे मी तिथे काम केलं, त्यानंतर करणने स्टुडंट ऑंफ द इयरमध्ये मला आणि वरु ण धवनला संधी दिली! एकूणच मुंबईत मला संघर्ष चुकला नाही.