शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

होळ शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

By admin | Updated: August 4, 2016 01:08 IST

दीड महिन्यापासून वारंवार मागणी करूनही जिल्हा परिषद शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिला जात नाही

वडगाव निंबाळकर : दीड महिन्यापासून वारंवार मागणी करूनही जिल्हा परिषद शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिला जात नाही, या कारणास्तव होळ (ता. बारामती) येथील संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी शाळेला टाळे ठोकले. दरम्यान, केंद्रप्रमुखांनी वरिष्ठांशी चर्चा करून पर्यायी शिक्षक उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.बारामती तालुक्यातील होळ येथील असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. या ठिकाणी ३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. द्विशिक्षकी असलेल्या या शाळेत एका शिक्षकाच्या बदलीनंतर दुसरा शिक्षकच देण्यात आलेला नाही. ३२ पट असलेली ही शाळा अवघ्या एकाच शिक्षकाला सांभाळावी लागत आहे. गतवर्षी शाळेत दोन शिक्षक कार्यरत होते.य् त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेळोवेळी तोंडी मागणी करूनही येथे शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नव्हती. याबाबत शाळेस त्वरित दुसरा शिक्षक मिळावा, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पालकांनी लेखी निवेदनाद्वारे पंचायत समितीकडे केली होती. या वेळी संतोष भंडलकर, रघुनाथ धुमाळ, सुरेश होळकर, दीपक वाघ, संतोष भिसे, संजय होळकर, महेंद्र भंडलकर, कल्पना चौधरी, सारिका भोसले, नवनाथ होळकर, विजय वाघमारे, नामदेव भिसे आदींसह प्रेरणा यूथ फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेला टाळे ठोकल्यानंतर केंद्रप्रमुख संजय गायकवाड यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली.