शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडचा माणूसच मराठीचा वारकरी

By admin | Updated: January 8, 2017 00:43 IST

‘मराठी भाषेच्या नावाने गळे काढणारा, जो मराठी उच्चभ्रू समाज आहे, तो इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचा पुरस्कर्ता आहे. मराठीचा प्रत्यक्षातील वापर, मराठीचे मराठीपण टिकवणाराच

कल्याण : ‘मराठी भाषेच्या नावाने गळे काढणारा, जो मराठी उच्चभ्रू समाज आहे, तो इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचा पुरस्कर्ता आहे. मराठीचा प्रत्यक्षातील वापर, मराठीचे मराठीपण टिकवणाराच मराठी भाषेचा खरा वारकरी आहे. मराठी भाषा खऱ्या अर्थाने वारकरी, महानुभव पंथासह संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांच्या अनुयायांनी जोपासली आहे. मराठीची खरी अस्मिता ग्रामीण भागातच जोपासली जात आहे. जोपर्यंत गावाकडचा माणूस तिची अस्मिता जोपासत आहे, तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी येथे केले.कल्याणच्या शारदा मंदिरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी एक दिवसाचे विद्यार्थी साहित्य संमेलन झाले, या प्रसंगी जोशी बोलत होते. कल्याण सार्वजनिक वाचनालय, आगरी युथ फोरम आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन झाले. या प्रसंगी महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार नरेंद्र पवार, अभिनेत्री सोनाली खरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, पदाधिकारी भिकू बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. जोशी यांनी सांगितले, ‘विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गोंधळ करावा, त्याविरोधात मी नाही. जे आवडत नाही, ते ठामपणे सांगा. गोंधळ करण्यापूर्वी भाषा, साहित्य, देश, समाज समजून घ्या. मग विरोध करा. विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भाषेचे महत्त्व पटणे, हे अखिल भारतीय मराठीच्या प्रचार आणि प्रसाराचे काम आहे. ज्या शहरात मराठी साहित्य संमेलन होते, तेथून भाषेचा प्रचार-प्रसार संपत नाही, तर तो तेथून सुरू होतो. मायमराठी भाषेत आपल्या माणसावर रागवता येते. एखाद्याला शिवीही आपल्याच भाषेतून कचकचून घालता येते. परभाषेत आपल्याला व्यक्त होता येत नाही. स्वभाषेत आपण चांगले व्यक्त होऊ शकतो. सध्याच्या विद्यार्थी वर्गाकडे अनेक साधने आहेत. आमच्या काळात साधने नव्हती, याकडे जोशी यांनी लक्ष वेधले, तसेच विचारवंतांनी समाजाला दिशा देण्याची गरज आहे,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.संमेलनाचे स्वागताध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘हे विद्यार्थी साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीच्या पार्श्वभूमीवर घेतले असले, तरी ते कल्याणमधील अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदी ठरो.’ महापौर देवळेकर यांनी कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. या संमेलनातून त्यांना त्यांचे बालपण आठवले, त्याचा उच्चार त्यांनी केला. आमदार पवार यांनी सांगितले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकाराने अमळनेर येथे प्रीतिसंगम संमेलन भरवले होते. त्याच संमेलनासाठी माझा पुढाकार होता. तेव्हा मी एक कार्यकर्ता होतो. त्याच संमेलनाची आठवण या निमित्ताने होत असल्याचे सांगून, सर्जिकल स्ट्राइकवरील शहीद जवानांच्या कुटुंबीयांची व्यथा मांडणारी एक कविता सादर केली. अभिनेत्री खरे यांनी सांगितले की, त्यांची आई एका ग्रंथालयात असल्याने त्यांना अनेक पुस्तके वाचता आली. मराठीच्या जागरासाठी प्रत्येक शहरातून विद्यार्थी साहित्य संमेलने घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)बालकल्याण स्मरणिकेचे प्रकाशन- विद्यार्थी साहित्य संमेलनानिमित्त तयार केलेल्या बालकल्याण या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्मरणिकेचे संपादन योगेश जोशी यांनी केले. अत्यंत कमी कालावधीत १२ लेख व ४० कवितांनी ही स्मरणिका तयार केली. त्यात ४० शाळांनी सहभाग घेतला. - संपादक जोशी यांनी सांगितले की, ‘परदेशात नो टीव्ही डे साजरा केला जातो. त्या दिवशी विद्यार्थ्यांनी टीव्ही बघायचा नाही. अशा काही संकल्पना आपल्याकडेही सुरू झाल्यास, विद्यार्थी वाचन-लेखनाकडे वळतील.’ - ही स्मरणिका एका पालखीतून वाजत-गाजत संमेलन व्यासपीठावर आणली गेली. विठ्ठल-रुक्मिणी यांंची वेशभूषा करून विद्यार्थी आले होते. त्यांच्या शिरावर ही स्मरणिका वाहून आणण्यात आली.