शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता ठप्प

By admin | Updated: February 12, 2016 01:32 IST

आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाचा विसर युती सरकारला पडला असून या योजनेचे काम अक्षरश: ठप्प झाले आहे.

- अतुल कुलकर्णी, मुंबईआघाडी सरकारच्या काळात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाचा विसर युती सरकारला पडला असून या योजनेचे काम अक्षरश: ठप्प झाले आहे. गेल्या दीड-दोन वर्षापासून जिल्हा आणि विभागनिहाय तपासण्या न झाल्याने तत्कालीन मंजुरी असलेल्या कामांना सरकारने स्थगिती देऊन टाकली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी स्वच्छता मोहिम हाती घेतली असली, तरी महाराष्ट्रातील भाजपा सरकारला मात्र ग्रामस्वच्छतेविषयी कमालीची अनास्था असलयाचे दिसून येत आहे. आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेले राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ठप्प झाल्याची बाब काँग्रेस पक्षाने निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारने दोन वर्षाच्या कामांना स्थगिती देऊन टाकली आहे.यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाच्या उपसचिवांनी जिल्हा परिषद आणि विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ग्राम स्वच्छता अभियानंतर्गत २०१४-१५ मधील विभागस्तरीय तपासण्या अद्याप झालेल्या नाहीत. त्या लवकर पूर्ण करण्याबाबतही कळविण्यात आले होते, परंतु अद्याप त्या तपासण्या झालेल्या नाहीत. शिवाय २०१५/१६ ची प्रक्रिया करण्यासही विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामांना स्थगिती देण्यात येत आहे. योजनांचे तीनतेराराज्यात ग्राम स्वच्छतेच्या नावाखाली स्वच्छ भारत ग्रामीण मिशन, निर्मल भारत अभियान आणि संत गाडगेबाबा अभियान अशा या तीन योजना होत्या. शिवाय, युती सरकारने शहरी भागासाठी सप्तपदी या नावाने नवीनच योजना सुरु केली. त्यामुळे तीन-तीन योजनांचे रेकॉर्ड जमा करता-करता अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येऊ लागले. गावे किती स्वच्छ झाली , यापेक्षा सरकारी कार्यालयात कागदांचे ढीग मात्र जमू लागले.कोणी चुका केल्या, कोणी कामचुकारपणा केला हे तपासण्याचे अधिकार सचिवांना दिले जातील. मात्र गाडगेबाबांच्या नावाने सुरु केलेली योजना बंद केली जाणार नाही. ही योजना फक्त पुरस्कारपुरती उरली होती. त्यात दुरुस्त्या करुन ती नव्याने लवकरच सुरु केली जाईल.- बबनराव लोणीकर, पाणी पुरवठा मंत्रीगाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे संपूर्ण राज्यात प्रभावी परिणाम दिसले .राज्य सरकारला ही योजना बंदच करायची आहे. स्थगितीचा निर्णय हा योजना बंद करण्याच्या प्रक्रियेतील पहिले पाऊल आहे. - खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस