नाशिक : ओझर येथील नाशिक विमानतळावरील सेवानिवृत्तीची साग्रसंगीत पार्टी आयोजित करणे विमानतळाचा ठेका घेणारे हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक व बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विलास बिरारी यांच्या चांगलेच अंगलट आले असून, गुरुवारी ते दिंडोरी तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.विशेष म्हणजे पोलिसांनी विलास बिरारी यांना या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार ठरविले असून, आधी दाखल केलेल्या गुन्ह्णात आणखी एक कलम वाढविले आहे. यापूर्वी आॅर्केस्ट्रा संचालक सुनील ढगे यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. पार्टीचे आयोजन करणारे हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक विलास बिरारी दिंडोरी पोलिसांसमोर गुरुवारी शरण आले. (प्रतिनिधी)अधिकारी मोकळेच?पोलिसांनी आॅर्केस्ट्रा संचालकासह या पार्टीची परवानगी घेणारे हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक विलास बिरारी यांनाच केवळ अटक केली आहे. मुळातच ज्यांनी परवानगी दिली व ज्यांच्यासाठी ही पार्टी आयोजित केली त्यांच्याच आधी पोलिसांनी मुसक्या आवाळणे अपेक्षित असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र मोकळेच असल्याचे चित्र आहे.
नाशिकमध्ये विलास बिरारी यांना अटक
By admin | Updated: February 6, 2015 01:52 IST