शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडातील व्यावसायिक, रहिवासी त्रस्त

By admin | Updated: June 28, 2016 03:17 IST

तालुका व परिसरात भारनियमना व्यतिरिक्त सततच्या होणाऱ्या विजेच्या लंपडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहे़

राहुल वाडेकर,

विक्रमगड : तालुका व परिसरात भारनियमना व्यतिरिक्त सततच्या होणाऱ्या विजेच्या लंपडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहे़ दिवसभर वीज गुल होत असल्यामुळे नागरिकांचे व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत़ प्रत्येक शुक्रवारी दुरुस्तीच्या नावाखाली होणारी दिवसभराची वीजकपात आणि इतर दिवशीही वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे येथील जनता बेजार झाली आहे़ खेडयातील आदिवासी सकाळी शेतावर जातो तो रात्रीच परत येतो त्यामुळे जातांना व येतांना त्याला तर वीज दिसतच नाही़ याबाबत महावितरणाकडे वारंवार तक्रारी करुनही परिस्थितीत कोणत्याही प्रकारची सुधारणा केली जात नाही़ शुक्रवारी दिवसभर दुरुस्तीसाठी वीज कपात केली जाते मग वारंवार वीज खंडीत का होते असा सवाल नागरीक करीत आहेत़ ही समस्या सुटणार तरी कधी असा सवाल केला जात आहे विक्रमगड तालुक्यावर महावितरण इतर तालुक्याच्या तुलनेत अन्याय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. चोवीस तासांपैकी फक्त काही तासच वीज तीही रात्री उपलब्ध होत आहे. दिवसाच्या वीजपुरवठ्यात सातत्य नसल्याने त्याचा फारसा उपयोग नाही . त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे़ वीजेवर चालणारी उपकरणे बंदच असतात़ तर कधी कमी दाबाच्या प्रवाहामुळे ती चालत नाहीत़ तर कधी दाब वाढल्याने उपकरणे जळतात. विजेचा वापर होत नसतांनाही महावितरण ग्राहकांकडून वीज बील वसूली करीत आहे़ विज बीले वेळेवर भरली नाहीत तर वीज पुरवठा खंडीत केला जातो़ अनेक वेळा वीज खंडीत होत असते. याचा फटका विजेवर व्यवसाय करणाऱ्यांना मोठया प्रमाणात बसलेला असून विक्रमगड तालुक्यांत हजारोंच्या संख्येने झेरॉक्स, कॉम्प्युटर, दुकानदारआहेत़ छोेटेमोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत या समस्येमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याने काही व्यवसायिक दुसऱ्या शहरातस्थलातरीत झाले आहेत़ महावितरणाने विक्रमगडची वीजेची समस्या सोडवावी अशी जनतेची मागणी आहे़प्रत्येक शुक्रवारी विजेच्या असलेल्या समस्या,दुरुस्ती करण्याकरीता दिवसभर विज खंडित करुन भार नियमन केले जाते व त्यामध्ये दुस्तीची कामे केली जात असल्याचे महावितरण कंपनीकडुन सागण्यात येते.मग वारंवार विज खंडीत होण्याचे प्रकार का होतात़ रात्र रात्र लोकांना का जागुन काढावी लागते़ विजेच्या समस्या तशाच का आहेत़- प्रशांत भानुशाली गांव तंटामुक्ती अध्यक्ष विक्रमगड