शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विक्रम गोखले, सायरा बानो यांना राज्याचा ‘जीवनगौरव’

By admin | Updated: April 20, 2017 06:15 IST

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे यंदा राज्य शासनाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे यंदा राज्य शासनाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली.मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना दरवर्षी राज्य शासनातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सायरा बानो यांना ‘राजकपूर जीवनगौरव’, तर विक्रम गोखले यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, ‘व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेते अरुण नलावडे यांना आणि ‘राजकपूर विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे. या ‘जीवनगौरव’ पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५ लाख रुपये  व स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. राज्य शासनाच्या वतीने वांद्रे रिक्लेमेशन येथील म्हाडा मैदान क्र. १ येथे यंदा ५४ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ््यात या चौघांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार घोषित झाल्याचा आनंद आहे. मात्र, या पुरस्कारामुळे भारावून न जाता अधिक जोमाने कामाला लागणार आहे. आपल्या कामाला मिळालेली दाद प्रत्येक वेळी जबाबदारी अधिक वाढतेय, याची जाणीव करून देणारी असते.- अरुण नलावडे