राहूल वाडेकर,
विक्रमगड/तलवाडा-निसर्गाचा लहरीपणा व लांबत चालेला पाऊस तसेच वातावणातील बदल त्याचा परिणाम यंदा पुन्हा आंबा बागायतींवर झालेला असुन परिणामी विक्रमगडचा प्रसिद्ध असलेला हापुस व केसर मे महिना सुरु व्हायला आला तरीही बाजारात दाखल झालेला नाही़ दरवर्षी हा आंबा बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते़ मात्र, यंदा आंबा कमी आल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे हा हंगाम लांबत चालेला आहे़ या परिस्थितीमुळे हा आंबा जुनमध्ये हातात येण्याचे चिन्ह आहे. महत्वाचे म्हणचे यंदा पाऊस लवकर पडण्याचे चिन्ह असल्याने जेव्हा या आंबापट्या बाजारात येतील तेव्हा त्याकडे पारंपारिक ग्राहक पाठ फिरवतील असा अंदाज आहे. पावसात हा अंबा खराब होऊन बागायदारांचे मोठे नुकसान होण्याचे चिन्ह आहे.यंदा आंबा उत्पादनात बरीचशी घट सहन करावी लागणार असल्याने व दहा ते बारा टक्के उत्पादन हाती लागणार असल्याचे येथील बागायतदार शेतकरी महेश शांताराम पाटील, राजाराम ढोणे, अमोल सांबरे, संदेश राउत, श्यामराव आळशी, विजय खुताडे, आनंद महाले आदींनी लोकमला सांगीतले़ विक्रमगडमध्ये केसर व हापुस आंब्याचे उत्पन्न घेतले जाते परंतु पाहिजे तसे उत्पन्न निघत नसल्याने या बागायतींकडे अनेक जण पाठ फिरवत आहेत.मधल्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बागायदारांचे सर्व मनसुबे उद्व्स्त झाले. शासकीय यंत्रणाकडूनही पुरेशी मदत मिळाली नाही.