शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत 'विजयोत्सव'!

By admin | Updated: May 9, 2014 09:51 IST

क्रेनच्या सहाय्याने घातलेला लक्षवेधी पुष्पहार..अन् गुडेवारसाहेब तुम आगे बढो असा हजारो लोकांनी दिलेला नारा अशा 'न भूतो...' वातावरणात चंद्रकांत गुडेवार यांनी महापालिकेचा पुन्हा पदभार स्वीकारला.

सोलापूर: दिवसभर खणखणत असलेले फोन....दुपारी तीन वाजल्यापासून गर्दी...कार्यालयाबाहेर फुलांच्या पायघड्या... ढोलीबाजाचा दणदणाट... इंद्रभुवनासमोर उभारलेली विजयाची गुढी... क्रेनच्या सहाय्याने घातलेला लक्षवेधी पुष्पहार..अन् गुडेवारसाहेब तुम आगे बढो असा हजारो लोकांनी दिलेला नारा अशा 'न भूतो...' वातावरणात चंद्रकांत गुडेवार यांनी महापालिकेचा पुन्हा पदभार स्वीकारला.काँग्रेस नगरसेवकांनी पाण्यासाठी केलेले आंदोलन आणि त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक यामुळे गुडेवार यांनी सोमवारी पदभार सोडून शासनाकडे बदलीची मागणी केली होती. याच कारणावरुन शहरात तीन दिवस गुडेवारांसाठी आंदोलने करण्यात आली. याची दखल घेऊन शासनाने देखील गुडेवारांना मनपाचा तत्काळ पदभार स्वीकारावा, असा आदेश दिला होता. गुडेवार चार वाजता पदभार स्वीकारणार असल्यामुळे इंद्रभुवनाला गुरुवारी आगमनाची प्रतीक्षा लागली होती. आयुक्त कार्यालयात दिवसभर साहेब कधी येणार याची विचारपूस करण्यासाठी फोन खणखणत होते. दुपारी तीन वाजल्यापासून महापालिकेत कामगार, नागरिक, पीबी ग्रुपचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते जमू लागले होते. जसजसा घड्याळाचा काटा चारकडे सरकत होता तशा प्रत्येकाच्या नजरा आयुक्तांच्या आगमनाकडे लागल्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेने इंद्रभुवनासमोर गुढी उभारली तर पीबी ग्रुपने कार्यालयाबाहेर गुलाबांच्या पायघड्या टाकल्या होत्या. मनपा कर्मचार्‍यांनी देखील आयुक्त कार्यालय फुलांनी सजविले होते. ढोलीबाजा आणि गर्दी यामुळे वातावरण भारावून गेले होते. सव्वाचार वाजले आणि आयुक्तांची गाडी मुख्य प्रवेशद्वारावर आली. एकच जल्लोष झाला. फटाके फोडले, पेढे वाटले तर काहींनी ठेका धरुन डान्स केला. त्याचवेळी वरुणराजाने देखील हलक्या सरींनी आयुक्तांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार आडम मास्तर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, कामगार नेते अशोक जानराव, सुरेश फलमारी, उषा शिंदे, जगदीश पाटील यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांनी जल्लोषपूर्ण वातावरणात आयुक्तांचे स्वागत केले. पीबी ग्रुपचे आनंद चंदनशिवे यांनी क्रेनच्या सहाय्याने गुडेवार यांना घातलेल्या भल्या मोठय़ा पुष्पहाराने लक्ष वेधले.
नाद करायचा नाही'नाद नाय करायचा, गुडेवारांचा नाद नाय करायचा' या गाण्याच्या ठेक्यामुळे वातावरणात अधिकच रंग भरला. इंद्रभुवनासमोरील वारद पुतळ्याजवळ नागरिकांनी आयुक्तांना फेटा बांधून तसेच पेढा भरवून स्वागत केले. भारावलेले वातावरण पाहून आयुक्त गुडेवार देखील भावनावश झाले होते. बँजोच्या गाडीमध्ये उभा राहून त्यांनी सर्वांचे आभार मानले.
स्वप्न साकार करू दोन दिवसांपूर्वी मी पदभार सोडायला नको होता, मात्र त्याशिवाय तुमचे प्रेमही कळाले नसते (हशा...), अशा भावना आयुक्त गुडेवार यांनी व्यक्त केल्या. शहराचे नावलौकिक होईल असे काम करुन दाखवू . शहराचे स्वप्न साकार करू, तुमचे प्रेम असेच राहू द्या, असे ते म्हणाले. वर्षभरात पाणीप्रश्न मिटेल. पाण्याचे जे जे विषय मनपा सभागृहापुढे निर्णयासाठी आहेत त्याबाबत मी महापौरांशी बोलणार आहे. लवकरच या विषयांना मंजुरी देण्यात येईल. - चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त