शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विजयदुर्ग बंदर आंतरराष्ट्रीय बनणार

By admin | Updated: June 28, 2015 23:30 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा : देवगडचे अर्थकारण बदलणार

अयोध्याप्रसाद गावकर- देवगड --आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर होण्याची क्षमता असलेले विजयदुर्ग बंदर विकासापासून दूर राहिले आहे. मात्र, सावंतवाडी येथे मुख्यमंत्र्यांनी नुकतीच विजयदुर्ग बंदराच्या विकासाची घोषणा केल्यामुळे विजयदुर्ग बंदर आता आंतरराष्ट्रीय बंदर बनण्याची आशा पल्लवित झाली आहे. तसेच आनंदवाडी प्रकल्पालाही वाढीव निधी मंजूर होऊन हाही प्रकल्प काही महिन्यांत सुरू होणार आहे. यामुळे आता या दोन प्रकल्पांमुळे देवगडचे अर्थकारण बदलणार आहे.निसर्गरम्य परिसर, स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ला व एक सुसज्ज बंदर म्हणून विजयदुर्ग बंदराचा उल्लेख केला जातो. केवळ ९० किलोमीटरच्या अंतरावर समुद्रात वसलेले आंग्रीया बेट ही पर्यटनस्थळे असूनही विजयदुर्ग अजूनही पर्यटनदृष्ट्या विकसित झाले नाही. लाखो पर्यटक दरवर्षी विजयदुर्गला येत असतात. मात्र, पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे पर्यटक खंत व्यक्त करतात. सन २००८ मध्ये अष्टशताब्दी महोत्सवाने येथील पर्यटनाला चालना मिळाली. किल्ल्यावर झालेले तिसरे दुर्ग साहित्य संमेलन अशा विविध महोत्सवातून येथे पर्यटन राबविण्याचा प्रयत्न केला गेला. केवळ महोत्सव न करता न्याहारी निवास योजनांसारखे उपक्रम विजयदुर्गमध्ये राबवून येथील प्रत्येकाला उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे म्हणून प्रयत्न केले. अष्टशताब्दी महोत्सवावेळी देश, विदेशातून लाखो पर्यटकांनी विजयदुर्गला उपस्थिती दर्शविली होती. नुकतेच मेमध्ये येथील एका स्थानिकाने विजयदुर्ग खाडीमध्ये पर्यटकांसाठी फेरीबोट सुरू केली आहे. फेरीबोटीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून समुद्राचा पर्यटक आनंद घेत आहेत. विजयदुर्ग हे आंतरराष्ट्रीय बंदर होणार असल्याचे शासनकर्त्यांकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात हे बंदर आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून केव्हा नावारूपास येईल, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर विजयदुर्ग बंदराची विकासाची अंमलबजावणी, प्रतीक्षा, उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.कोकण किनारपट्टीवरील जुन्या काळापासून आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजयदुर्ग बंदराचा शासनाच्या उदासीनतेमुळे विकास झाला नाही. ऐतिहासिक वास्तू व तेथील असणारी भौगोलिक परिस्थिती यामुळे विजयदुर्ग बंदर हे पर्यटनदृष्ट्या व व्यापारी केंद्र म्हणून पूर्णपणे सुसज्ज आहे. जगातील अतिशय सुरक्षित बंदर असून आयात-निर्यातीसाठी या बंदराचा वापर सध्या असलेल्या परिस्थितीतही सहज करणे शक्य आहे. ही मळी या बंदरातून जपान, कॅनडा या देशांत निर्यात केली जाते. आज नामवंत कंपन्यांच्या बोटी चौगुले कंपनी, गोवा येथील साळगांवकर कंपनीच्या के्रन या बोटीच्या दुरुस्तीसाठी व पावसाळ्याच्या दिवशी सुरक्षिततेच्यादृष्टीनेदेखील या बंदराचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आर्थिक सुबत्ता येणारआनंदवाडी प्रकल्प हा देवगडमधील महत्त्वाचा प्रकल्प असून, हा प्रकल्प काही कारणांमुळे बंद पडला आहे. मात्र, २ जुलै रोजी होणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला २९ कोटींवरून ९२ कोटींपर्यंत निधी मंजूर करून या प्रकल्पाचे काम पुनश्च सुरू होणार असल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिल्याने आता विजयदुर्ग बंदर व आनंदवाडी प्रकल्पाच्या कामांना सुरुवात होणार आहे. यामुळे देवगड तालुक्याचे नाव हे आता अर्थकारणामध्ये रोवून याठिकाणी आर्थिक सुबत्ता निर्माण होणार आहे.